satara sakal
सातारा

Satara News : मलकापूर, आनेवाडीत पाच किलोमीटरपर्यंत रांगा;रविवारी वाहतूक कोंडीची डोकेदुखी;पोलिस यंत्रणाही ठरली हतबल

संबंधित कंत्राटदाराने महामार्गाचा नवीन उड्डाणपूल बांधण्यासाठी बॅरिकेटिंग केल्यामुळे दोन्हीही लेनवरील वाहतूक उपमार्गावर वळवलेली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मलकापूर - जाण्यासाठी चाकरमान्यांची गडबड आणि सहापदरीकरणासाठी मलकापुरात केलेल्या बॅरिकेटिंगमुळे वाहतूक कोंडी होत असते. मात्र, रविवारी कोल्हापूर सातारा लेनवर वारंवार कोंडी झाल्याने पोलिसांसह स्थानिकांची डोकेदुखी वाढली. गणेशोत्सव संपवून रविवारी परतीच्या प्रवासातील वाहनांची गर्दी वाढल्यामुळे पाच किलोमीटरपर्यंत ट्रॅफिक जॅम झाले होते. ही कोंडी फोडण्यासाठी पोलिसही हतबल झाले होते.

कऱ्हाडसह मलकापूर शहरांमध्ये तालुक्यातून व महामार्गावरून दररोज ये-जा करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, वाहनांसह प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. प्रत्येक रविवारी कोल्हापूर-पुणे लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. संबंधित कंत्राटदाराने महामार्गाचा नवीन उड्डाणपूल बांधण्यासाठी बॅरिकेटिंग केल्यामुळे दोन्हीही लेनवरील वाहतूक उपमार्गावर वळवलेली आहे.

सुटीवर आलेल्या मुंबईकरांचा कामावर जाण्यासाठी रविवारी परतीचा प्रवास असतो. प्रत्येकाकडे चारचाकी वाहन असल्यामुळे रविवारी महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होत असते. मात्र, या रविवारी गणेशोत्सवानिमित्त गावोगावी आलेल्या चाकरमान्यांच्या वाहनांची वर्दळ सकाळपासूनच वाढली होती. रस्ता अरुंद व हे काम आणि वाहनांची वर्दळ वाढल्याने मलकापुरात वाहतूक कोंडी होऊन या लेनवर पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक वळवलेल्या ठिकाणची वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांनाही कसरत करावी लागत होती.

टोल नाक्‍यावर वाहतूक कोंडीमुळे मनस्‍ताप

पुणे- बंगळूर महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यावर आज सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने अनेक वेळा वाहतूक विस्कळित होऊन प्रवासी वर्गाला मनस्ताप सहन करावा लागला होता.

गणेशोत्सवानिमित्त गावी आलेले मुंबई- पुणे येथील चाकरमानी पाच दिवसांचे गणपती विसर्जन उरकून पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी परतत असल्याने येथील महामार्गावर असणाऱ्या आनेवाडी टोल नाक्यावर आज सकाळपासूनच वाहनांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीत अनेक वेळा रुग्ण वाहतूक करणाऱ्या रुग्णवाहिका देखील अडकून पडल्या होत्या. वाहनांच्या रांगा टोल नाक्यापासून तब्‍बल पाच किलोमीटरपर्यंत लागल्‍या होत्या. टोल व्यवस्थापन व भुईंज पोलिस ठाण्‍याचे वाहतूक पोलिस जाम झालेले ट्रॅफिक योग्य पद्धतीने काढण्यासाठी प्रयत्‍न करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT