Satara Latest Marathi News 
सातारा

वणवे रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांची वानवा; अधिकाऱ्यांची निसर्गाचे रक्षण करताना होतेय दमछाक

यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (जि. सातारा) : हजारो हेक्‍टर डोंगररांगांतील वनसंपदेचे संरक्षण वन विभागाच्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून होत असल्याने वणवे लावणाऱ्यांवर कारवाई करताना अथवा निसर्गाचे रक्षण करताना त्यांची पुरती दमछाक होताना दिसत आहे, तरीही त्यांनी दुर्लक्ष न करता दोषींवर कठोर कारवाई करून इतरांपुढे धाक निर्माण करण्याची गरज आहे. 

जानेवारी ते मार्चअखेर गड, डोंगरांत वणवे लागण्याचे व पर्यायाने लावण्याचे प्रमाण अद्यापही आटोक्‍यात आलेले नाही. सततच्या वणव्यांनी डोंगर काळेकुट्ट पडून उघडे बोडके दिसू लागले आहेत. दर वर्षी त्याची पुनरावृत्ती होते. वणवे लावण्यामागे अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना नाहीत, असल्या तर त्या कागदावर आहेत. या उपाययोजना अधिक प्रभावी न राबविल्यास सह्याद्रीच्या पर्वतरांगातील वनसंपदा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. 

वणव्यांत छोठी-मोठी झाडे, वेली, गवत यांसह सरपटणारे प्राणी, किटक नष्ट होत आहेत, तर बिबट्या, भेकर व ससे आदींचा वावरही येथे अधोरेखित झाला आहे. त्यांचीही वस्तीस्थाने व आश्रयस्थाने आगीच्या वणव्यात भस्मसात होत आहेत. त्याचा परिणाम स्वरूप वन्यप्राणी मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. या वणव्यांकडे पाहण्याखेरीज अथवा जुजबी उपाय करण्याखेरीज वनविभाग काहीच करू शकत नाही. तेव्हा यावर काही तरी ठोस उपाययोजना करायला हवी, अशी अपेक्षा निसर्गप्रेमींतून व्यक्त होत आहे. 

वणवा लावल्याने पुढील वर्षी दुप्पट गवत येते या गैरसमजुतीतून वणवे लावले जातात. तेव्हा गावोगावी कृषी क्षेत्राशी निगडित व्यक्ती, निसर्गप्रेमी व्यक्ती, सामाजिक कार्यकर्त्यांच्या वनसमित्या स्थापन करून त्या माध्यमातून वणव्यांविषयी प्रबोधन केले पाहिजे, तसेच वणवे लावणाऱ्यांवर कठोर कारवाई केली पाहीजे.

-प्रशांत भांदिर्गे, निसर्गप्रेमी, तारळे 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT