Satara Latest Marathi News 
सातारा

पाटण तालुक्‍यात वणव्यांचा भडका; नैसर्गिक वनसंपदा संपुष्टात येण्याची भीती

अरुण गुरव

मोरगिरी (जि. सातारा) : पाटण तालुक्‍यात वनक्षेत्र असलेल्या गावांच्या ठिकाणी वनसरंक्षण समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. त्यामार्फत वनांचे रक्षण केले जाते. मात्र, गावोगावी स्थापन केलेल्या या वनसरंक्षण समित्या कागदावरच असल्याने त्यांचा उद्देश सफल होताना दिसत नाही. परिणामी, वनक्षेत्रात लागलेल्या वणव्यामुळे परिसरातील डोंगर काळेकुट्ट दिसत असून वनसंरक्षण समित्या कुचकामी ठरल्या आहेत. वणवे टाळण्यासाठी वन विभागाने वन संरक्षण समितीबरोबर लोकांच्या जनजागृतीची मोहीम प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. 

पाटण तालुक्‍याला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. डोंगरदऱ्यांनी विखुरलेला हा भाग आता वणव्यामुळे काळाकुट्ट दिसत आहे. या आगीत अनेक वनौषधी, सरपटणारे प्राणी, त्यांची अंडी, घरटी जळून खाक होत आहेत. पावसाळ्यात गवत चांगले येते म्हणून ग्रामीण भागात हे वणवे लावले जातत. या वणव्यांना आळा घालण्यासाठी वन विभागाच्या वतीने गावोगावी वन संरक्षण समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्या सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणीकृत आहेत. 

या समितीतील कार्यकारी मंडळ या वनांची देखभाल करत असते. गवत व अन्य मार्गाने निधी गोळा केला जातो. त्या माध्यमातून जाळरेषा काढणे, आग लागल्यानंतर माहिती संबंधित विभागाला देणे, वणवे लावण्यावर आळा घालणे अशा प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. मात्र, दिवसोंदिवस या वन संरक्षण समित्यांचे वणव्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पाटण तालुक्‍यातील डोंगरावरील वनसंपदेला पुन्हा वणव्याची झळ बसू लागली आहे. वारंवार डोंगराला आग लागण्याच्या घटनांमुळे नैसर्गिक वनसंपदा संपुष्टात येण्याची भीती व्यक्त होत आहे.

आगीची माहिती अनेक वेळा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना नसते. काही वेळा डोंगरावरील आग विझविण्यासाठी ते धावपळ करतात. मात्र, तोपर्यंत अनेक लहान-मोठी झाडे आगीत जळून खाक झालेली असतात. गावोगावी स्थापन केलेल्या या वन सरंक्षण समित्या कागदावरच असल्याने त्यांचा उद्देश सफल होताना दिसत नाही. वणवे टाळण्यासाठी वन विभागाने वन सरंक्षण समितीबरोबर लोकांच्या जनजागृतीची मोहीम प्रभावीपणे राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. 

वृक्षलागवडीसाठी केलेला खर्च पाण्यात 

पाटण तालुक्‍यात शासनामार्फत पावसाळ्यात वृक्षलागवड मोहीम हाती घेतली जाते. मोठा गाजावाजा करून वृक्षलागवड होते. त्यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असते. मात्र, लावलेल्या झाडांचे, रोपट्यांचे वन विभागाकडून जतन आणि संरक्षण होताना दिसत नाही. त्यामुळे शासनाचा हा खर्च पाण्यात जात असल्याची वस्तुस्थिती आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Coastal Road Closed : मुंबई कोस्टल रोड उद्या ५ तास बंद... कसे असतील पर्यायी मार्ग, प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा

Nitin Gadkari : अक्कलकोट विधानसभेच्या आणखी दोन महत्त्वाच्या कामाला मंजुरी देण्याची गडकरींची घोषणा; विकास कामात राजकारण न करण्याचे केले आवाहन

Pune News : पेशवेकालीन भूमिगत जलवाहिनी जीर्णोद्धारास स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी

CGHS नियमांमध्ये मोठा बदल! आता आई-वडील किंवा सासू-सासरे यांच्यापैकी एकालाच मेडिकल लाभ मिळणार; नवा नियम लागू

PBKS vs MI Live : शार्दूल ठाकूरची 'स्टम्प' तोड गोलंदाजी! पंजाबने ३३ धावांत गमावले ६ फलंदाज; 'लॉर्ड'च्या ४ विकेट्सने फिरली मॅच Video

SCROLL FOR NEXT