Satara Latest Marathi News 
सातारा

पाटण तालुक्‍यात दिवसाढवळ्या झाडांची कत्तल; वृक्षतोडीला लगाम लावणारेच बनले 'भक्षक'

विलास माने

मल्हारपेठ (जि. सातारा) : विभागात अवैध वृक्षतोड जोरात सुरू असून, वनविभाग मात्र कोमात गेला आहे. एकीकडे झाडे लावा म्हणून नारा, तर दुसरीकडे अवैध वृक्षतोडीला लगाम लावणारेच भक्षक झाले, की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. व्यापारी आणि वनविभागाची मिलिभगत असल्याने अवैध वृक्षतोडीला अभय मिळत असल्याने जिल्हा उपवन अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमींतून होत आहे. नवारस्ता येथील चेकनाका अशा बाबींसाठी "शोपीस' ठरत आहे.
 
पाटण तालुक्‍याच्या पश्‍चिम विभागातून बॉयलरसाठी मोठ्या प्रमाणात जंगलातून वृक्षतोड केली जाते. रात्री दहानंतर गाड्या सांगली, इस्लामपूर, कऱ्हाड, सातारा, तासवडे या ठिकाणी असणाऱ्या कंपन्यांच्या बॉयलरसाठी पाठवल्या जातात. काही ठराविक गाड्यांचा परवाना घेतला जातो आणि बाकी मिलीभगतचा खेळ रात्रीत चालतो. या व्यतिरिक्तही परिसरात जळाऊ लाकडांच्या वखारीसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. 

बागायती पट्टा सोडला तर मल्हारपेठ विभागातील बहुले, त्रिपुडी, चोपडी, सोनवडे, मरळी, कोरिवळे, उरूल आणि मोरणा विभागातील बहुतांश गावांतील शेताच्या बांधाला असणाऱ्या झाडांची दिवसाढवळ्या कत्तल केली जात आहे. पेट्रोल कटरच्या साह्याने अवघड ठिकाणीही तोड करण्यास सुलभ होत असल्याने अशा ठिकाणी वृक्षतोड जोरात सुरू आहे. सध्या उन्हाळा सुरू झाल्याने शेताशेजारील झाडे वाडसण्याची जुनी प्रथा आहे. त्यातच अशा झाडांच्या कत्तल करण्याचा सफाटा वनभक्षकांनी लावला आहे. एकीकडे वनविभाग दर वर्षी शतकोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवते तर दुसरीकडे वृक्षांची कत्तल सुरू आहे. त्यामुळे जे व्यापारी वनसंपदेच्या जीवावर आपले खिसे भरतात. त्यांना शासनाने झाडे लावण्याचीही सक्ती केली पाहिजे. 

झाडे लावण्याची सक्ती अन्‌ भक्षक वाऱ्यावर 

अगदी जिल्हा परिषद शाळेपासून सर्व शासकीय विभागांतील कर्मचाऱ्यांना झाडे लावण्यासाठी सक्ती केली जाते मग अशा भक्षकांना वाऱ्यावर का सोडले जाते हा प्रश्न आहे. व्यापारी व वनविभागाच्या अधिकाऱ्यांची "सेटलमेंट'ची चर्चा मोठ्या प्रमाणात होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अशा अवैध वृक्षतोडीला लगाम लावण्याची आवश्‍यकता आहे 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथेक्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Reaction : ‘’मी जर पूर्ण दाढीवरून हात फिरवला असता, तर..’’ ; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा!

IND vs ENG 2nd Test: बॅट निसटली, विकेट गेली! Rishabh Pant च्या आक्रमणाला ब्रेक, मोडला ५९ वर्षांपूर्वीचा विक्रम, Viral Video

कसलं भारी! आईच्या वाढदिवसाला लेकीने आणला मालिकांचा केक; जन्मदात्रीचा आनंद गगनात मावेना, Video Viral

Ashadhi Wari: दिंडीत मोकाट जनावरांचा हल्ला; अनेकजण जखमी, चिमुकल्यांचाही समावेश

Bhor Police : ५८ पैकी २९ पोलिस कार्यरत, ५० टक्के जागा रिक्त; भोर पोलिस ठाण्याची स्थिती

SCROLL FOR NEXT