Satara Latest Marathi News Satara News 
सातारा

कॉंग्रेसच्या चुकीच्या कृषी कायद्यांमुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जानकरांचा गंभीर आरोप

प्रवीण जाधव

सातारा : कॉंग्रेसचे कृषी कायदे चुकीचे असल्यानेच देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या रोखण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने कायदे केलेत. या विधेयकामुळे शेतकऱ्यांचा लाभच होणार असल्याचे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व माजी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले. केंद्राने केलेल्या कृषी कायद्याचेही त्यांनी समर्थन केले. 

राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा येथील नगरपालिका मंगल कार्यालयात नुकताच मेळावा पार पडला. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जानकर म्हणाले, केंद्रीय कृषी मंत्री तोमर हे शेतकऱ्यांचे पुत्र आहेत. शेतकऱ्यांची परिस्थिती त्यांना चांगलीच माहित आहे. कॉंग्रेसचे कृषी कायदे चुकीचे असल्यानेच देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्या रोखण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने कायदे केले आहेत. या विधेयकामुळे शेतकऱ्यांचा लाभच होणार आहे.

पशुसंवर्धन मंत्री असताना गायीच्या व म्हशीच्या दुधाला दर वाढवून दिला. आता भाजप व मित्र पक्षांचे सरकार सत्तेवर नाही महाविकास आघाडीचे सत्तेवर आहे, त्यांची नियत चांगली नाही, असा आरोपही त्यांनी केला. सध्या देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर टीका करताना जानकरांनी सरकारच्या कृषी कायद्याचे समर्थन केले, तसेच त्यांनी कॉंग्रेसच्या कृषी कायद्यांवर जोरदार टीका केली.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT