satara sakal
सातारा

Satara News : प्रेम विवाहाला मदत केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांकडून एकाला बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबासाहेब पवार यांच्या मुलगीने एकासोबत पळून जावून

(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड - प्रेम विवाहाला मदत केल्याच्या संशयाच्या रागातून मुलीच्या नातावेईकांकडून एकास मारहाण झाली. त्यात संबधिताचा मृत्यू झाला. जनार्दन महादेव गुरव (वय ४९, रा. राजमाची) असे मृताचे नाव आहे. काल रात्री अकराच्या सुमारास राजमाची येथे घटना घडली. त्या हजारमाचीतील १० जणांवर खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्यातील तिघांना पोलिसांनी अटक आहे. बाबासाहेब पवार, विकास पाडळे व विनायक चंदुगडे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना येथील फौजदारी न्यायालयात उभे केले असता पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबासाहेब पवार यांच्या मुलगीने एकासोबत पळून जावून विवाह केला आहे. त्याला पवार कुटूंबियांचा विरोध होता. काही दिवसांपासून त्यांचा शोध सुरू आहे. त्याच दरम्यान त्यांना राजामाची येथील जनार्दन गुरव पळून गेलेल्यांच्या संपर्कात आहे, अशी माहिती मिळाली. त्यानुसार त्याची खात्री करण्यासाठी काल रात्री पवार व त्याचे आठ ते दहा जण जण जनार्दनच्या राजमाची येथील घरी गेले

त्यांनी त्यांस बाहेर बालवून घेतले. चौकशी करताना उत्तरे नीट देत नसल्याने ते तेथून त्याला घेवून बाजूला गेले. काहीव वेळाने गुरव यास लाकडी दांडक्यासहीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे व गुरव जखमी असल्याची माहिती त्यांच्या कुटूबियांना मिळाली. गुरव कुटूबिंय तेथे धावत आले. त्यावेळी गुरव जखमी अवस्थेत निपचीप पडले होते.

त्यांनी अन्य लोकांच्या मदतीने त्वरीत त्यांना कृष्णा रूग्णालयात हलवले. उपचार सुरू असताना रात्री गुरव यांचा मृत्यू झाला. त्याची माहिती कळताच राजमाची परिसरात तणावाचे वातावरण होते. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसही तत्काळ तेथे पोचले. पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रदीप सुर्यवंशी,

सहायक पोलिस निरिक्षक एस. एम. शितोळे यांनी घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. त्या घटनेबाबत प्रमोद पवार यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार १० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील तिघांना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना येथील फोजदारी न्यालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी मिळाली आहे, सहायक पोलिस निरिक्षक शितोळे तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Moshi Building Collapse: पुण्यातल्या मोशी दुर्घटनेत १४ जणांची सुटका तर ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू, बचावकार्य अजूनही सुरुच

Pune News: कामावर गेला, पण घरी परतलाच नाही! २४ वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, राजगड तालुक्यातील शिरकोली येथील घटना..

MHT CET 2026: राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! बीई, बी.टेकच्या नोंदणीसाठी मुदतवाढ, प्रवेश घेण्याची शेवटची संधी..

Pune News: पालखी अवघ्या तासांवर; उरुळी कांचनमध्ये महामार्गावर चिखलाचा राडारोडा, वारकऱ्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

Latest Marathi News Live Update : मुक्ताईंच्या पालखीचे बीडमध्ये आगमन

SCROLL FOR NEXT