Satara Latest Marathi News 
सातारा

राज्यातील बारा हजार ग्रंथालये आर्थिक संकटात; शासनाच्या दुर्लक्षाने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ

साहेबराव होळ

गोडोली (जि. सातारा) : गेल्या वर्षीच्या जूनपासून राज्य शासनाकडून ग्रंथालयांना अनुदानासह कर्मचाऱ्यांना पगार मिळालेले नाहीत. मार्च महिना संपत आला तरी एकूण अनुदानाच्या फक्त 23.7 टक्‍केच रक्कम शासनाकडून मिळाली आहे. त्यामुळे राज्यातील 12 हजार 615 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही दुर्लक्ष केल्याने कर्मचाऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे. 

महाराष्ट्रात वाचन चळवळ वाढावी म्हणून अनेक वर्षांपासून शासनमान्य वाचनालये, खासगी स्वयंअर्थसहायता वाचनालये, शाळा कॉलेजमध्ये वाचनालये चालू आहेत. लॉकडाउनच्या कालावधीत नागरिकांच्या वाचनात वाढ झाल्याचेही दिसून आले. मात्र, राज्य शासनाने शासनमान्य वाचनालयांच्या आर्थिक बाबींकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहे. गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. आजही तशीच स्थिती आहे. लॉकडाउनच्या संकटामुळे महाविकास आघाडी सरकारने ग्रंथालयांना वर्षातून दोनदा मिळणारे अनुदान चार टप्प्यात देणे सुरू केले. त्यातही मागील वर्षीपासून वेतन व वेतनेतर अनुदान मिळाले नसल्याने अनेक ग्रंथालये बंद पडली. 

अनेक कर्मचाऱ्यांना कुटुंबांचा खर्च भागवणे अडचणीचे झाले आहे. सातारा जिल्ह्यात "अ' वर्गात नऊ ग्रंथालये व 38 कर्मचारी, "ब' वर्गाची 62 ग्रंथालये व 186 कर्मचारी, "क' वर्गातील 158 ग्रंथालये आणि 316 कर्मचारी व "ड' वर्गाची 166 ग्रंथालये आणि 166 कर्मचारी अशा एकूण 395 ग्रंथालयांत 706 कर्मचारी कार्यरत आहेत. यापूर्वी जुलै व फेब्रुवारी, मार्चमध्ये अनुदान मिळत होते. त्यातून वर्षभराचे वेतन, वीजबिल, पेपरबिल, मासिके वर्गणी भाडे, स्टेशनरी, फोनबिल, सभा-समारंभ, प्रवास, वार्षिक मेळावा, प्रशिक्षण आदी खर्च भागविला जायचा. प्रसंगी पदरमोड करून, देणगी मिळवून खर्च केला जात होता. पण, सध्या कोरोनाच्या काळात देणगीदारांनी हात आखडता घेतला आहे.

सध्याच्या परिस्थितीत शासनमान्य ग्रंथालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. या उलट राज्यातील मोठ्या शहरांमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी खासगी संस्थांनी उभारलेली ग्रंथालये ही विद्यार्थ्यांकडून भरमसाट फी आकारून चालू आहेत. कर्मचाऱ्यांना मिळणारे वेतन कोणत्याच कामगार कायद्यात बसत नाही. शिपाई व ग्रंथालयांना मिळणारे वेतन रोजगार हमी पेक्षाही कमी असते. "क' वर्गातील ग्रंथपालांना दरमहा सात हजारांपर्यंत, तर "ड' वर्गातील ग्रंथपालाला प्रतिदिन 41 रुपये 50 पैसे एवढे वेतन मिळते. ग्रंथालये व ग्रंथपालांना वेतनश्रेणी सेवानियम व सेवाशर्ती लागू नसल्याने कर्मचाऱ्यांचे भविष्यही अंधारात आहे. वाचक वर्गणी कमी होणे, नवीन सभासद न वाढणे, नियमित परिरक्षण अनुदान हप्ते न मिळणे, लोकाश्रय व राजाश्रय कमी होणे अशा स्थितीत कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. परिणामी, राज्यातील 21 हजार 615 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

आता सर्व काही शासनभरोसे 

तालुका ते राज्यस्तरावरील सर्व संघटनांनी आपापल्या परीने शासनाकडे अनुदानासाठी प्रयत्न करूनही फारसे यश आलेले नाही. शासनाने मार्चमध्ये उर्वरित सर्व अनुदान वेळेत दिले नाही, तर महाराष्ट्रातील ग्रंथालये सर्वच बाजूंनी अडचणीत येतील व पुढील काळात पुन्हा कर्मचारी नेमणे व त्यांना पगार देणेही व्यवस्थापनाला अडचणीचे होणार आहे. कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडणे व्यवस्थापनाला परवडणारे नाही. सध्याच्या परिस्थितीतून मार्ग काढणे केवळ शासनाच्या हाती आहे. 

कार्यसम्राट आमदारांकडून दुर्लक्ष 

नुकत्याच झालेल्या संपूर्ण अधिवेशन काळात कोणत्याही पक्षाच्या आमदाराने सार्वजनिक वाचनालयाचा अडचणींचा प्रश्न उपस्थित केला नाही. यावरून समाजसेवक, लोकप्रिय, कार्यसम्राट, लाडके प्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या लोकप्रतिनिधींचे वाचन किती दांडगे आहे व वाचनाबद्दल त्यांना किती कमालीची आस्था आहे, हे दिसून येते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Auction Live : राजस्थानमधील १९ वर्षीय पोराच्या डोक्यावर CSK ने ठेवला हात! मोजले तब्बल १४ कोटी; Who is Kartik Sharma?

द फॅमिली मॅन फेम अभिनेत्याची ड्रग तस्करी प्रकरणात तुरुंगात रवानगी; फिल्म इंडस्ट्रीतील ओळखीचा करत होता गैरवापर

Paithan News : केकत जळगावमध्ये ग्रामस्थांची सतर्कता कामी आली; महावितरण तार चोरीचा प्रयत्न फसला!

Jalgaon News : थंडीचा कडाका अन् मेथीच्या लाडूंचा तडका! जळगावात घराघरांत दरवळला पारंपरिक स्वाद

IPL 2026 Auction: CSK ने प्रशांत वीरवर १४ कोटी का लावले? २० वर्षीय खेळाडूकडे असं काय आहे खास? वाचाल तर खूश व्हाल

SCROLL FOR NEXT