Satara Latest Marathi News 
सातारा

'एक कदम स्वच्छता की ओर'; शहरांसह ग्रामीण भागात 'स्वच्छता अभियाना'चा फार्स

अरुण गुरव

मोरगिरी (जि. सातारा) : स्वच्छ गाव व सुंदर गाव करण्यासाठी म्हणून खेडोपाडी "एक कदम स्वच्छता की ओर' म्हणत सुरू केलेले स्वच्छता अभियान निव्वळ फार्स ठरू लागले आहे. सभोवताली कचऱ्याचे साम्राज्य, तर सांडपाण्यांनी तुंबलेली गटारे, सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे ग्रामपंचायतींचे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्यामुळे पाटण तालुक्‍यातील ग्रामीण भागात स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले असून ग्रामविकासाचा पाया ढासळताना दिसत आहे. 

केंद्र सरकारने स्वच्छ भारत अभियान राबविणे सुरू केले आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीने विविध भागात स्वच्छता मोहीम राबवली. पाटण, नवा रस्ता, मल्हारपेठ या ठिकाणी असलेल्या बाजारपेठा सोडल्या, तर खेडेगावांमध्ये कचरा उचलण्यासाठी कोणतीही सुविधा नाही. बाजारपेठेमध्ये अनेक भागात कचरा उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. 

विविध भागात कचऱ्याचे ढीग साचलेले दिसून येतात. मात्र, ते उचलले जात नाहीत. सार्वजनिक स्वच्छतागृहे तर मद्यपींचा अड्डा बनली आहेत. काही स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. शहरी भागात केवळ सरकारी उपक्रम म्हणून या अभियानाकडे पाहिले जात आहे, तर ग्रामीण भागात स्वच्छता मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी होताना दिसत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घरासमोर खेळत होती चिमुकली, आईच्या डोळ्यादेखत कारनं चिरडलं; २ सेकंदात श्वास थांबला, घटना CCTVत कैद

Pune waste Management: बीपीसीएल तयार, पण पुणे महापालिकेसमोर १२ एकर जागेचा पेच; कचऱ्यापासून गॅस प्रकल्पाला बायोमायनिंगचा अडथळा

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

Marathi News Live Updates : जरांगे पाटील यांनी आंदोलन स्थगित करावं- प्रसाद लाड

Education Institution Corruption: शिक्षण संस्थेत भ्रष्टाचाराचे आरोप, तपास समिती चौकशीला आली असतानाच प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू; काय घडलं?

SCROLL FOR NEXT