Satara Latest Marathi News 
सातारा

रासपचे संस्थापक, माजी मंत्री महादेव जानकर यांना मातृशोक

सकाळवृत्तसेवा

सातारा : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जगन्नाथ जानकर (वय ९२) यांचे आज वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांना एकूण तीन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. सातारा जिल्ह्यातील पळसावडे (ता. माण) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती संबंधित कुटुंबीयांनी दिली.

गुणाबाई जानकर यांचे मूळगाव सातारा जिल्ह्यातील धनगरवाडी आहे. गुणाबाईंनी शिक्षण घेतलेले नसले तरी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांचा संभाळ करून त्यांना उच्चशिक्षित बनवले.

माजी मंत्री महादेव जानकर यांच्या संघर्षाच्या काळात आईने त्यांना साथ दिली. मुलांनी शिक्षण घ्यावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. महादेव जानकर हे मंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या बंगल्याच्या शेजारी निवासस्थानी राहण्याची संधी त्यांना मिळाली, त्यांच्या कष्टाचे चीज झाले, अशीच सर्वांनी भावना त्या वेळी व्यक्त केली होत्या. या त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad News: रिल्सच्या नादात जीव गमावला, धबधब्यात पाय घसरून खोल दरीत कोसळला; २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू, Video Viral

Tomato Market: 'लाल सोन्या'ची कमाल! नारायणगाव टोमॅटो बाजारात चार महिन्यांत १३७ कोटींची विक्रमी उलाढाल, उन्हाळी टोमॅटो हंगाम ठरला फायदेशीर

Live-in Relationship : महिला लिव्ह-इन पार्टनरला पत्नी इतकाच अधिकार, दोषी पुरुषाला खावी लागणार जेलची हवा; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

Latest Marathi News Live Update : प्रशांत किशोर यांची भक्कम आघाडी; 3 पैकी 2 जागांवर भाजपला फटका बसण्याची शक्यता

Amba Ghat Road Collapse : कोल्हापूर-रत्नागिरी प्रवासापूर्वी ही बातमी वाचा! आंबा घाट बंद झाल्यानंतर अणुस्कुरा मार्गावर काय घडतंय?

SCROLL FOR NEXT