Satara Latest Marathi News 
सातारा

'शासनाचा आमच्यावर अन्याय'; गुरव समाजाचे सरकारविरोधात मलकापुरात आंदोलन

राजेंद्र ननावरे

मलकापूर (जि. सातारा) : येथील गुरवकीच्या जमीन शासनाने बेकायदेशीरपणे पालिकेच्या नावावर केली. हा आमच्या समाजावर अन्याय आहे. या जमिनीबाबत योग्य न्याय द्या, अशी मागणी करत आज गुरव समाज बांधवांनी पालिकेसमोर उपोषण केले. सध्या जमावबंदी आदेश असल्यामुळे तुम्हाला एकत्र बसता येणार नाही, अशा सूचना शहर पोलिसांनी करताच गुरव समाजाचे उपोषण 15 तारखेपर्यंत स्थगित करण्यात आले. 

पालिकेने नवीन प्रशासकीय इमारत बांधलेली जमीन जुन्या सर्व्हे नंबर 558 मधील 114 गुंठे जमीन गुरव समाजाच्या नावावर होती. त्यानंतर आम्हा चौघांनाही विचारात न घेता नंतर शासनाने बेकायदेशीरपणे ती पालिकेच्या नावावर केली आहे. संबंधित इमारतीचे बांधकामही अंतिम टप्प्यात आले आहे. त्या जमिनीसाठी आम्ही अनेक वेळा उपस्थित राहून दाद मागूनही शासनाने योग्य न्याय दिला नाही.

एकतर जमीन द्या अन्यथा जमिनीचा मोबदला तर द्या, अशी मागणी करत गुरव समाजातील कुटुंबानी सोमवारी सकाळी पालिका कार्यालयासमोरच उपोषणासाठी ठिय्या मारला. मात्र, सध्या जमावबंदी आदेश असल्यामुळे तुम्हाला एकत्र बसता येणार नाही. अशी सूचना कऱ्हाड शहर पोलिसांनी करताच गुरव समाजाचे उपोषण 15 तारखेपर्यंत स्थगित करण्यात आले. या वेळी शिवाजी गुरव, अशोक गुरव, अरविंद गुरव, किरण पुजारी, मनीषा गुरव, राधिका गुरव यांच्यासह कुटुंबीय उपोषणास बसले होते. गुरव समाजाच्या उपोषणाला शेतीमित्र अशोकराव थोरात, सुधाकर शिंदे यांनी पाठिंबा दिला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chamoli Tunnel Collapse: अचानक स्फोटाचा आवाज, काही क्षणांत टनल बनली ‘मृत्यूचा सापळा’; 7 जणांचा मृत्यू, वाचलेल्यांनी सांगितला थरार

MD Smuggling: एमडी तस्करीसाठी दुबईतून फंडिंग; जरीपटका येथील मुख्य आरोपीविरोधात ‘लुक आऊट’ नोटीस

Maharashtra River Linking: मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा! महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प; याच वर्षी काम सुरू होणार

Marathi News Live Updates : वीर धरणातून 5,737 क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू

Kolhapur Baby Death : दूध पाजताना काळजी घ्या! अवघ्या 31 दिवसांच्या बाळाचा ठसका लागून दुर्दैवी अंत; कोल्हापुरातील काळीज पिळवटून टाकणारी घटना

SCROLL FOR NEXT