Satara Latest Marathi News 
सातारा

ऐन परीक्षेत एसटीअभावी विद्यार्थ्यांची कुचंबना; आगारप्रमुखांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज

धनंजय चिंचकर

कातरखटाव (जि. सातारा) : गुरसाळे (ता. खटाव) येथून वडूज येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थिनींना वेळेत एसटी बस मिळत नसल्याने ऐन परीक्षेच्या काळात परिसरातील विद्यार्थिनींची कुचंबना होत आहे. आगारप्रमुखांनी तातडीने लक्ष घालून बससंदर्भात उपाययोजना करावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

कोरोना आपत्तीच्या काळात गुरसाळ्यातून वडूजला येणाऱ्या अनेक बसफेऱ्या रद्द झाल्या आहेत. निमसोड- शेनवडी- वडूज व म्हासुर्णे- वडूज या दोन फेऱ्या सकाळी असतात. मात्र, निमसोड भागातूनच गाडी पूर्णपणे भरून येत असल्याने ती गुरसाळे गावात थांबत नाही. त्यामुळे गुरसाळेतील विद्यार्थिनींना नाईलाजाने खासगी वाहनाचा आसरा घ्यावा लागण्याबरोबरच दुचाकीस्वारांना लिफ्ट मागून प्रवास करावा लागत आहे. 

या प्रकारामुळे एखादी दुर्घटना झाल्यास त्यास वडूज आगार जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर दीक्षा जाधव, ऋतुजा जाधव, निकिता जाधव, ऋतुजा चिंचकर, अरुणा जाधव, धनश्री धुमाळ, श्रृती शेंडगे, कोमल जाधव, प्रतीक्षा सरगर, पूजा ढेसले, अकिता जाधव, महेक पटेल, सादिका शेख आदींच्या सह्या आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक खातात म्हणून विकतात, गुटखा विक्रेत्यांवर मकोका लावण्यावर मंत्र्यांचं अजब विधान; म्हणाले, अंगाशी येईल, कारवाईऐवजी....

Rahmanullah Gurbaz: गौतम गंभीरकडून घेतल्या टिप्स, अन् भारतीय गोलंदाजांवरच तुटून पडला; शतकानंतर गुरबाज म्हणाला...

Varya AI : भारताचं पहिलं AI व्हिडिओ टूल लाँच! फक्त टेक्स्ट टाकताच बनेल व्हिडिओ; पोस्ट करून कमवा हजारो रुपये, कसं वापरायचं? पाहा

Latest Live Updates Marathi: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रीक्षेत्र भीमाशंकर भेट; विकास आराखड्याच्या कामांची पाहणी

Pune: केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या हस्तक्षेपामुळे ७५ अमरनाथ यात्रेकरूंचा मार्ग मोकळा; विमान रद्द झाल्यानंतर तातडीने उपलब्ध करून दिली पर्यायी व्यवस्था

SCROLL FOR NEXT