सातारा

कऱ्हाड, पाटणला पावसाने झोडपले; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

सचिन शिंदे / जालिंदर सत्रे

कऱ्हाड/पाटण (जि. सातारा) : पावसाने कऱ्हाड-पाटण तालुक्‍याला रविवारी रात्री झोडपले. वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे भात, ज्वारी, ऊस पिके भुईसपाट झाली, तर दोन्ही तालुक्‍यांतील 50 हून अधिक विजेचे खांब पडून नुकसान झाले. त्यामुळे वीजपुरवठाही रविवारी रात्रीपासून सोमवार दुपारपर्यंत खंडित झाला. त्यामुळे मोठी गैरसोय झाली. पावसाने लाखो रुपयांचे नुकसान झाले. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. 

कऱ्हाड तालुक्‍यात रविवारी रात्री वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसादरम्यान आलेल्या वादळी वाऱ्यानेही पिके, घरे, विजेचे खांब यांचे मोठे नुकसान झाले. खरिपातील हातातोंडाशी आलेली पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. पाटण तालुक्‍यात भात पिके पोटऱ्यात असताना भुईसपाट झाल्याने उत्पन्नावर परिणाम होणार आहे. चार दिवस वातावरणात उष्णता वाढली होती. आंगाची लाहीलाही होत होती. रविवारी रात्री दहाच्या सुमारास विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसास सुरुवात झाली. अर्ध्या तासात सगळीकडे पाणीच पाणी झाले. पहाटे सहापर्यंत पाऊस पडत होता. त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. वादळी वाऱ्याने पोटऱ्यात असणारी भात पिके व अतिपावसात तग धरलेली ऊस पिके भुईसपाट झाली. 

मलकापूर परिसरातही नुकसान  : शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाने हजेरी लावली. वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळू पडली, फलक मोडून पडले, अनेक घरांचे पत्रे उडाले तर काही ठिकाणी भिंती पडल्या. काही ठिकाणी विजेचे खांब पडल्याने सोमवारी दिवसभर वीज व पाणीपुरवठा बंद राहिला. शेतात पाणीचपाणी साचल्यामुळे सोयाबीन व भुईमुगाचे पीक धोक्‍यात आली असून, कडधान्यांची पिके भुईसपाट झाली. हायब्रीड काळे पडण्याची शक्‍यता आहे. भाजीपाला पिकांचे मांडव पडल्याने नुकसान झाले. आयोध्यानगरीतील घरांचे पत्रेही पावसात उडून गेले. 

कोयना वसाहतीकडे जाणारी कृष्णा रुग्णालयाची व आगाशिवनगर झोपडपट्टी येथील कुंपणाची भिंत पडली. रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग शोधताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली. मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरातील पालक, मेथी, कोथिंबीर, टोमॅटो, दुधी भोपळा, काकडी, कारले, भेंडी, गवारी या पिकांचे नुकसान झाले. विठ्ठलदेव- आगाशिवनगर येथील पवार वस्तीमध्ये वीजवाहक तारांवर झाड पडले. अयोध्यानगरीत विजेचे खांब पडल्याने वीज खंडित झाला. त्यामुळे पाणीपुरवठा बंद राहिला. त्यामुळे नागरिकांचे हाल झाले. 

मसूरला पिके जमीनदोस्त  : पावसाने झोडपून काढल्याने वीजपुरवठा यंत्रणा बंद पडली. कऱ्हाड उत्तरमधील बाजारपेठा असलेल्या मसूर, उंब्रजसह 62 गावांमध्ये तब्बल 16 तास वीज गायब झाली. त्यामुळे लोकांना अख्खी रात्र काळोखात काढावी लागली. वादळी वाऱ्यामुळे उसासह खरीप हंगामातील पिके जमीनदोस्त झाली. काही ठिकाणी झाडाच्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्या. रात्री साडेआठच्या सुमारास मसूर, उंब्रज, चाफळ, चरेगाव, इंदोलीसह जवळपास 62 गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : इन्स्टाग्रामवरील व्हिडिओच्या वादातून नववीतील विद्यार्थिनीवर चाकू हल्ला; बावधन परिसरातील शाळेतील घटना

बुध वक्री होताच वृषभसह ६ राशींच्या अडचणी वाढणार; व्यवसायाबाबत निर्णय घेताना सावधगिरी गरजेची

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

SCROLL FOR NEXT