Satara Latest Marathi News 
सातारा

'कोयनेत जीव धोक्‍यात घालून काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद'

विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : कोरोना संसर्गात अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी कोयना विभागात उत्कृष्ट काम केल्याने विभागातून कोरोना हद्दपार झाला. अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना विरोधात दिलेला लढा व केलेली सेवा उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन पाटण रोटरी क्‍लबचे अध्यक्ष प्रदीप सागवेकर यांनी केले. 

रोटरी क्‍लब पाटणच्या वतीने कोरोना काळात कोरोनाचा "हॉटस्पॉट' बनलेल्या कोयना विभागात जीव धोक्‍यात घालून काम करणाऱ्या 105 अंगणवाडी सेविका, मदतनीस व आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार नुकताच करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. रोटरी क्‍लबचे सचिव जगदीश शेंडे, सदस्या अपर्णा शेंडे, पर्यवेक्षिका सुरेखा सुतार आदी उपस्थित होते. 

पर्यवेक्षिका सुरेखा सुतार म्हणाल्या, "कोविड कालावधीत कोयना विभाग वाचविण्यासाठी एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अविरतपणे निष्ठेने समाजसेवेचा वसा घेऊन काम केले. त्यामुळे कोयना विभाग कोरोनामुक्त झाला. त्यांचे हे काम गौरवास्पद आहे.'' या वेळी अंगणवाडीच्या 105 सेविका व मदतनीस यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सुनीता शेलार यांनी स्वागत केले. रंजना लाड यांनी आभार मानले. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai vs Vidarbha T20: आयुष म्हात्रे ऑन फायर! ८ षटकारांसह शतक अन सूर्या-दुबेची साथ; मुंबईचा विदर्भाविरुद्ध मोठा विजय

Mumbai Water Supply: मुंबईत १ आणि २ डिसेंबरला पाणी संकट! 'या' भागात पाणीपुरवठा विस्कळीत राहणार; तुमचा परिसर यादीत आहे का?

Aquarius Love Horoscope 2026: मार्च, जून अन् ऑक्टोबरचे गुरु गोचर बदलतील तुमची लव लाइफ; 2026मध्ये असं असेल कुंभ राशीचं भविष्य

School Holiday: राज्यात 5 डिसेंबरला सर्व शाळा बंद राहणार; जाणून घ्या कारण काय

Latest Marathi News Live Update: दहिसर परिसरात अनेक घरांमध्ये चोरी, सीसीटीव्ही फुटेज समोर

SCROLL FOR NEXT