Satara Latest Marathi News 
सातारा

अवैध वाळूसाठ्याचा वडगावमध्ये पंचनामा; शेतकऱ्यांच्या तक्रारीची 'महसूल'कडून दखल

सुहास शिंदे

पुसेसावळी (जि. सातारा) : वडगाव जयराम स्वामी (ता. खटाव) येथे नांदनी नदीकाठावर असणाऱ्या मळवी नावाच्या शिवारात अवैध वाळूसाठा केल्याची माहिती मिळाल्यानंतर काल सकाळी तलाठी श्री. परदेशी यांनी सुमारे नऊ ब्रास वाळूसाठ्याचा पंचनामा केला. या वेळी पोलिस पाटील किशोर नागमल उपस्थित होते. 

या वस्तीच्या शेजारीच 100 मीटर अंतरावर असणाऱ्या नांदणी नदीमधून हा वाळूसाठा उपसण्यात आल्याचे शिवारातील शेतकऱ्यांनी सांगितले. रविवार आणि धुलीवंदनच्या सुटीचा फायदा घेत हा अवैध वाळूसाठा करण्यात आला असल्याचे बोलले जात आहे. मात्र, शिवारातील शेतकऱ्यांनी याबाबतची माहिती महसूल प्रशासनास दिल्यानंतर वाळूसाठ्याचा तत्काळ पंचनामा करण्यात आला. 

वाळूसाठा करणारे दादासो दुटाळ यांना याबद्दल विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत बांधकामासाठी वाळू विकत घेतल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. पंचनाम्याचा अहवाल तहसीलदारांकडे पाठवण्यात येणार असल्याचे श्री. परदेशी यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT