सातारा

काँग्रेसच्या व्यापक बांधणीसाठी सोनिया गांधी सकारात्मक : पृथ्वीराज चव्हाण

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : काँग्रेस पक्षाच्या व्यापक बांधणीबाबत पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी सकारात्मक असून लवकरच त्या महत्वाचे निर्णय होवू शकतील. त्यासाठी काही बैठका होवून त्यावर निर्णय होईल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.  

श्रीमती गांधी यांनी आज दिल्ली येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीला आमदार चव्हाण दिल्लीत उपस्थित आहेत. बैठक सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरु होती. बैठकीनंतर आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आमदार चव्हाण म्हणाले, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष संघटनेसाठी सुचविलेल्या मुद्यांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ही बैठक आयोजित केली होती. पाच तास चाललेली बैठक अत्यंत सकारात्मक झाली. बैठकीत प्रत्येकाला बोलण्यासाठी वेळ देण्यात आला होता. काँग्रेस अध्यक्षांच्या सूचनेनुसार अशा अजून काही बैठक यापुढे होणार आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी जे मुद्दे मांडले होते ते पक्ष मजबुतीसाठी होते यासाठी आणखी पुढील बैठकीतमध्ये चर्चा केली जाणार आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT