सातारा

तारळे विभागात लालपरीअभावी प्रवाशांची गैरसोय; नोकरदार, विद्यार्थ्यांना मोठा फटका

यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (जि. सातारा) : "मिशन बिगीन' अंतर्गत नववी ते बारावी वर्ग सुरू झाले आहेत. आठवडा बाजार, सर्व उद्योगधंदेही खुले झालेत. या पार्श्वभूमीवर विभागातील एसटीच्या फेऱ्या पूर्ववत झाल्या. मात्र, विभागातील लालपरीच्या मुक्कामी फेऱ्या सुरू न झाल्याने कष्टकरी, नोकरदार, विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्याकडे अधिकारी डोळेझाक करीत असून विभागातील पूर्वीच्या मुक्कामी फेऱ्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होऊ लागली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेले सर्व व्यवहार खुले झाले आहेत. शेवटच्या टप्प्यात शाळा, कॉलेजही सुरू झालेत. सध्या कोरोना आटोक्‍यात आहे. सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर आदींचा वापर करून बाजारपेठा सुरू झाल्या, त्याच धर्तीवर विविध गावचे ठप्प झालेले आठवडी बाजारही सुरू झाले आहेत. त्यातच जनमाणसातील भीती कमालीची कमी झाली आहे. जनजीवन आता कुठेसे पूर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र, दळणवळणची समस्या बनली होती. त्याचा आठवडा बाजारावर परिणाम होत होता. लोकांना इच्छा असून वाहनांअभावी बाजारासह कामांना बाहेर पडता येत नव्हते.

विभागात सातारा, पाटण व कऱ्हाड, नागठाणे, उंब्रज आदी ठिकाणी नियमित फेऱ्या होत नव्हत्या. त्यावर 15 दिवसांपूर्वी "तारळे विभागाला लालपरीची प्रतीक्षा' या आशयाखाली दै. "सकाळ'मध्ये वृत्त प्रकाशित झाले होते. त्यानंतर गत आठवड्यात सर्व ठिकाणच्या फेऱ्या नियमित झाल्या आहेत. मात्र, भागातील पूर्वीच्या मुक्कामी फेऱ्यांची अजूनही प्रतीक्षाच आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी गंभीर्याने विचार करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे. मुक्कामी नसणाऱ्या बसफेऱ्यांमुळे सकाळी लवकर कामासाठी बाहेर पडणे व रात्री घरी येण्यासाठी लोकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शाळा, कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही फटका बसत आहे. मुरुड, जुगाईवाडी, पाबळवाडी, जळव, दुसाळे, कडवे आदी मुक्कामी फेऱ्या पूर्ववत कराव्यात, या मागणीने जोर धरला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT