Satara Latest Marathi News 
सातारा

उत्पादकांसह व्यापाऱ्यांना यंदा चिंच आंबटच; गतवर्षीच्या तुलनेत दरात मोठी घसरण

केराप्पा काळेल

कुकुडवाड (जि. सातारा) : चांगला पाऊसकाळ व अनुकुल हवामानामुळे चिंच फळाच्या उत्पादनात गतवर्षीपेक्षा यंदा दुपटीने वाढ झाली आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत चिंचेला 25 ते 30 टक्के भाव कमी मिळत असल्यामुळे चिंच उत्पादकांसह व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. 

मागील एक ते दीड महिन्यापासून चिंचेच्या काढणीस सुरुवात झालेली आहे. बऱ्यापैकी चिंचेच्या झाडांच्या चिंचा काढणीयोग्य झालेल्या आहेत. या पिकलेल्या चिंचेला बदलत्या हवामानाचा मोठा धोका असतो. जर साधे आभाळ भरून आले तरी चिंचांना पाणी सुटून चिकटपणा येतो आणि रंग बदलतो, अशी परिस्थिती सध्या झाली आहे. त्यामुळे चिंच उत्पादकांना चिंचा आंबट ठरल्या आहेत. 

गतवर्षी चिंचा झाडणाऱ्या मजुराला 600 रुपये तर गोळा करणाऱ्याला 200 रुपये रोज दिला जात होता. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा तीच मजुरी झाडणाऱ्याला 700 तर गोळा करणाऱ्या 250 अशी द्यावी लागत आहे. चिंचा फोडण्यासाठी गतवर्षी एका क्विंटलसाठी एक हजार एवढी मजुरी होती. तीच मजुरी यंदा प्रति क्विंटल दीड हजार रुपये एवढी झाली आहे. शिवाय यावर्षी डिझेलच्या दरात चांगलीच वाढ झाली असल्याने चिंच वाहतुकीच्या दरातही 30 ते 35 टक्के वाढ झाली आहे. 

गेल्या वर्षी फोडलेल्या चिंचेला प्रतिक्विंटल दहा ते 18 हजार एवढा भाव होता. हा भाव गृहित धरून व्यापाऱ्यांनी चिंचेच्या झाडांची खरेदी केली. मात्र, फोडलेल्या चिंचेचा भाव दहा ते 12 हजार असल्याने खरेदी तेजीत अन्‌ भाव कमी असल्यामुळे व्यापाऱ्यांचाही मोठा तोटा होत आहे. तसेच जुना मालही शिल्लक असल्याने नवीन मालाची खरेदी मंदावली आहे. 

"चिंचेचे उत्पादनात यंदा मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना आशा होती, चिंच गोड होईल. मात्र, चिंचेची काढणी, फोडणी, वेचणी आणि वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. वातावरण बदलाचाही चिंचांवर परिणाम होत असल्याने दरात घसरण झाली आहे.'' 

-आप्पा शेटे, चिंच व्यापारी, म्हसवड 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Silver Rate : युद्धाच्या वणव्याने सोने-चांदीच्या दराचा भडका, एका दिवसात मोठी वाढ

Ajit Pawar Plane Crash : ब्लॅक बॉक्सचं नुकसान, फ्लाइट डेटा रेकॉर्डर खराब; AAIBचा २२ पानी अहवाल, दुर्घटनेआधी एकच संदेश आला

Latest Marathi News Update: मुंबई-विजयदूर्ग रोरो सेवा आजपासून सुरू

अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्याला इराणचं प्रत्युत्तर, युएई, कतार, इराकसह ८ देशांना केलं टार्गेट; होमुर्झची सामुद्रधुनी केली बंद

15,78,00,00,000 इतकी आहे अमिताभ यांच्याकडे संपत्ती, आलिशान घर, महागड्या गाड्या आणि बरच काही...

SCROLL FOR NEXT