सातारा

दूषित पाण्यामुळे विहेत गॅस्ट्रोची साथ; 90 जणांना लागण

विलास माने

मल्हारपेठ (जि. सातारा) : विहे (ता. पाटण) येथे गॅस्ट्रोच्या साथीमुळे ग्रामपंचायत व आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात आला. पाणीपुरवठा विहिरीतील पाण्याचे शुद्धीकरण करण्यात आले. साथ आटोक्‍यात आणण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू असून आत्तापर्यंत 90 जणांना त्रास झाला आहे. 

गेल्या चार, पाच दिवसांपासून विहे येथे पाणी दूषित असल्याने नागरिकांना उलट्या, जुलाबाचा त्रास होत असून विहे उपकेंद्रात रूग्णाच्या तपासण्या केल्या असता गॅस्ट्रोसदृष्य साथीची लागन झाली असल्याचे वैद्यकीय तपासातून निष्पन्न झाले. आत्तापर्यंत 90 जणांना लागण झाली असून गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पाणी वितरण व्यवस्था करणाऱ्या पाईपलाईन, वॉल्व्ह, पाणी साठवण टाकी, पाणीपुरवठा विहीरीची साफसफाई कारण्यात येत आहे. 

दरम्यान, जिल्हा परीषद सदस्य विजय पवार व पंचायत समिती सदस्य सुरेश पानस्कर, आरोग्य विभागाचे डॉ. सुहेल शिकलगार यांनी गावास भेट देवून स्थानिक प्रशासनाशी चर्चा करुन परिस्थितीची पाहणी केली. साथीचे प्रमाण कमी होत असून घरोघरी नागरिकांचा सर्व्हे केला आहे. थोडे दिवस नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, स्थानिक प्रशासनाच्या सुचनाचे पालन करावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहेल शिकलगार यांनी केले आहे. पाणीपुरवठा विहीर व साठवण टाकीपासून काही अंतरावर वितरण वॉल्व्ह आहे. या ठिकाणचे दूषित पाणी पाइपमधून गेले असल्याची शक्‍यता आहे. विहरीतील गाळ काढून संपुर्ण पाणी क्‍लोरिनेशन केले आहे, अशी माहिती उपसरपंच अविनाश पाटील यांनी दिली. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought : लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमांवरील खर्च कमी करा, दुष्काळग्रस्तांना मदत करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे जनतेला आवाहन

IND vs WI 1st ODI Live: कुलदीप यादवची 'दादागिरी'! वारंवार संघाबाहेर बसवणाऱ्यांना सडेतोड उत्तर, जस्टीन ग्रीव्ह्सच्या शतकाच्या जोरावर विंडीजची मोठी धावसंख्या

गडचिरोलीतील सूफी संत 'जिलानी सरकार' यांचे निधन; भाविकांमध्ये शोककळा

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

छंदच बनला व्यवसाय! २१व्या वर्षी महिन्याभरात २.६४ कोटींची उलाढाल, तरुणाने असं काय केलं?

SCROLL FOR NEXT