Satara Latest Marathi News 
सातारा

साताऱ्यात पाणीपुरवठा त्वरित सुरू करा; नगराध्यक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सक्त सूचना

गिरीश चव्हाण

सातारा : शाहूपुरी परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कण्हेर धरण पाणी योजनेची पाहणी नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष मनोज शेंडे व इतर पदाधिकऱ्यांनी केली. पाहणीदरम्यान योजनेची प्रलंबित कामे गतिमान करत लवकर पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना पालिका पदाधिकाऱ्यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. 

योजना पाहणीवेळी पाणीपुरवठा सभापती सीता राम हादगे, आरोग्य सभापती अनिता घोरपडे, समाजकल्याण सभापती संगीता आवळे, नगरसेविका आशा पंडित, माजी पंचायत समिती सदस्य संजय पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता सतीश अग्रवाल, माजी शिक्षण सभापती राम हादगे, अतुल दिसले, संदीप सावंत, नंदू कांबळे आदी उपस्थित होते. या दौऱ्यात कण्हेर पाणी योजनेतील शाहूपुरीतील आठ लाख लिटर पाण्याची टाकी, पेढ्याचा भैरोबा येथील जलशुद्धीकरण केंद्र, तसेच कण्हेर योजनेच्या उपसा पंपगृहाची पाहणी करण्यात आली. 

पाहणीदरम्यान पंचायत समितीचे माजी सदस्य संजय पाटील यांनी प्रस्तावित क्षेत्रात नागरिकांना पाण्याबाबत येणाऱ्या अडचणी मांडल्या. पाहणीनंतर माधवी कदम, मनोज शेंडे, सीता हादगे यांनी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून योजनेच्या प्रलंबित कामांची माहिती घेत ती कामे मार्गी लावण्यासाठीच्या सूचना केल्या. ही योजना लवकरात लवकर पूर्ण होऊन जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची प्रतिक्रिया सीता हादगे यांनी या वेळी दिली. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Petrol Price Hike: पाकिस्तानात 2 दिवसांपूर्वी पेट्रोल स्वस्त, आज मोठी दरवाढ! भारतातही पेट्रोल-डिझेल महागणार?

Police Suspension News: 'खिशात पावडर टाकून तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करेन', मुलांना धमकी देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन; गृह विभागाचा दणका

AC चे तापमान २४ अंशांवर का ठेवावे?  'ब्यूरो ऑफ एनर्जी एफिशिएन्सी'ने सांगितला महत्वाचा नियम!

Latest Marathi Update : - नाशिकमध्ये पुराच्या धोक्याचा अलर्ट

Brain Health: फक्त व्यायाम नाही! मेंदू निरोगी आणि तल्लख ठेवण्यासाठी 'या' गोष्टीही आहेत महत्त्वाच्या; जाणून घ्या तज्ज्ञांचा गोल्डन मंत्र

SCROLL FOR NEXT