सातारा

उसाला एफआरपी एवढा पहिला हप्ता द्या; साताऱ्यातील जनप्रबोधन यात्रेत शेतकरी संघटनेची मागणी

उमेश बांबरे

सातारा : एकरकमी एफआरपी एवढा उसाला प्रतिटन पहिला हप्ता आणि अंतिम दर प्रतिटन चार हजार रुपये द्यावा, शेतीमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी यासह आठ ठराव काल (शनिवारी) शेतकरी संघटनेने जनप्रबोधन यात्रेच्या सांगता सभेत केले. 

शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रात शेतकरी संघटनेच्या वतीने जनप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेची सांगता साताऱ्यात झाली. संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील, जिल्हाध्यक्ष विकास जाधव, उपाध्यक्ष किशोर जाधव, राजेंद्र बर्गे, प्रकाश फडतरे, राजू पाटील आदी उपस्थित होते. जनप्रबोधन यात्रेला 28 नोव्हेंबरला कोल्हापूर येथून सुरुवात झाली होती. त्यानंतर सांगली, सोलापूर, नगर या जिल्ह्यांतील विविध ठिकाणी मेळावे झाल्यानंतर साताऱ्यात यात्रेची सांगता सभा झाली. 

श्री. पाटील म्हणाले,  "राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. या सरकारमधील प्रत्येक पक्षाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, अद्यापही कर्जमुक्तीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन बाळगले आहे. परिणामी, जिल्हा बॅंका, पतसंस्था, राष्ट्रीयीकृत बॅंका, खासगी बॅंका, नागरी बॅंका, पतसंस्थांनी वसुली सुरू केली आहे.'' यात्रेत शेतकऱ्यांना बाजाराचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे, शेतकऱ्यांकडून वसूल केले जाणारे अप्रत्यक्ष कर कमी करावे, शेतकऱ्यांना कर्ज व वीजबिलातून मुक्त करा, दोन साखर कारखान्यांमधील अंतराची अट रद्द करावी, गायीच्या दुधाला प्रतिलिटर 40 रुपये, तर म्हशीच्या दुधाला 60 रुपये भाव द्यावा, सी. रंगराजन समितीच्या शिफारशीची अंमलबजावणीसाठी कार्यक्रम आखणे आदी मागण्यांचे ठराव जनप्रबोधन यात्रेत करण्यात आले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT