सातारा

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जावळीच्या अर्थकारणाला कृषी पर्यटन केंद्रांमुळे चालना

विजय सपकाळ

मेढा (जि. सातारा) : दुर्गम डोंगराळ व ऐतिहासिक असलेल्या जावळी तालुक्‍यात तरुणाई आता कृषी पर्यटन या शेतीपूरक व्यवसायाकडे वळत असल्याने आता डोंगरदऱ्यात कृषी पर्यटन केंद्रे उभी राहत असून, ती पर्यटकांना आकर्षित करू लागली आहेत. डोंगर माथ्यातून रस्ते, वीज व पाणी उपलब्ध झाल्याने बेरोजगारांच्या हाताला काम आणि योग्य दाम कृषी पर्यटनातून मिळत असल्याने डोंगराळ भाग आता कात टाकू लागला असून, जावळी आता महाबळेश्वरपाठोपाठ पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे. 

पूर्वी जावळी म्हटले की, दऱ्याखोऱ्याची व घनदाट जंगलांची जावळी, चंदरराव मोरेंची त्यानंतर छत्रपतींची हीच ती जावळी, शिवप्रतापभूमी म्हणजे जावळी, संत तुकाराम महाराजांच्या वंशजांची जावळी व गडकोटांसह घनदाट जंगलांचा दुर्गम दुर्ग वासोटा किल्ला असलेली जावळी अशीच तिची ऐतिहासिक ओळख. सह्याद्रीच्या रांगांमध्ये कुशीत वसलेल्या जावळीत प्रचंड मोठा पाऊस आणि उन्हाळ्यात प्यायला पाणी नाही, असे विदारक चित्र जावळीमध्ये आजही कायम दिसत आहे. प्यायलाच पाणी नाही, तर शेतीला पाणी कोठून येणार, त्यामुळे पावसावर अवलंबून शेती, त्यामुळे हवालदिल झालेला शेतकरी, त्यामुळे अनेकजण पोटापाण्यासाठी गावांकडून मुंबई व पुणे येथे स्थिर झालेले आहेत. 

आता जावळीतले हे चित्र बदलण्यास सुरवात झाली आहे. जावळी तालुक्‍याच्या हद्दीला लागूनच असलेले देशभर प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर आहे. पाचगणी, वाई, सातारा आहे. त्यामुळे येथील पर्यटकांनाही आता जावळीच्या डोंगररांगा आणि कृषी पर्यटन केंद्रे आता खुणवू लागली आहेत. पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. त्यात विशेषकरून महाबळेश्वर-वाई रस्त्याला असलेल्या भिलारमधून येणारा सायघर, मार्लीमार्गे मेढा रस्ता, कासकडे जाणारे कुसुंबी व इतर ठिकाणाहून येणारा रस्ता या मार्गासह केळघरमार्गे महाबळेश्वर, नांदगणे मार्ग केडंबे-बोंडारवाडी रस्ता यासह पाचगणी येथून येणारा करहर रस्ते आता पर्यटकांनी बहरू लागले आहेत. या रस्त्यालगत आता हळूहळू का होईना कृषी पर्यटन केंद्र वाढत असून, त्यामधून एक दोन नव्हे तर शेकडो हातांना काम मिळत आहे. 

कृषी पर्यटन केंद्रांना शासकीय मान्यता देण्यासंदर्भात सोपी पद्धत करून शासनाच्या योजनांमधून सवलतीच्या दरात वित्तपुरवठा व्हावा. राष्ट्रीयीकृत बॅंकांकडूनही कर्जपुरवठा व्हावा. शासन मान्यतेसंदर्भात नवीन कृषी पर्यटन धोरणातील तरतुदींबाबत जमिनीची अट कमीत कमी 20 गुंठे ठेवून शासनाने जिल्हा पातळीवर त्याची व्यवस्था करावी. तरच पर्यटन केंद्रे ऊर्जितावस्था धारण करून टिकतील.
-अर्चना पवार, संचालिका, सह्यगिरी कृषी पर्यटन केंद्र, सह्याद्रीनगर, ता. जावळी 

जावळीत नैसर्गिक, कृषी पर्यटनामुळे... 

  • शेकडो बेरोजगारांना रोजगार 
  • दर माहिन्याला लाखोंची उलाढाल 
  • कृषी पर्यटनामुळे कवडीमोल किमतीतील पड ओसाड जामिनीला सोन्याचे दर 
  • परराज्यातील व व्यावसायिक, उद्योजक, बॉलीवूड व अभिनेत्यांची जावळीत जमिनीत गुंतवणूक 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : बावधन पोलिस चौकीसमोरची परिस्थिती

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT