Satara Latest Marathi News 
सातारा

उंब्रज परिसरात वाळू चोरट्यांचा धुमाकूळ; दहशत निर्माण करत माफियांचा राजरोस उपसा

संतोष चव्हाण

उंब्रज (जि. सातारा) : उंब्रजसह परिसरातील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरू असून, रात्रंदिवस नदीपात्रात चक्क जेसीबीच्या साहाय्याने वाळू उपसा सुरू आहे. मात्र, याबाबत महसूल विभागाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. उलट वाळू उपसा करणाऱ्यांकडून मारहाण करून दहशत निर्माण केली जात असल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांतून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. यामध्ये संबंधित विभागाचे अर्थपूर्ण संबंध असल्याची चर्चा नागरिकांतून होत आहे. 

उंब्रजसह परिसरात वाळू चोरट्यांनी सध्या धुमाकूळ घातला असून, दहशत निर्माण करत राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे. उत्तरमांड, तारळी, कृष्णा नदीपात्रातून रात्रंदिवस बेकायदा वाळू उपसा सुरू असून, लाखो रुपयांची वाळू विक्री केली जात आहे; परंतु निवडणुकीच्या कामामुळे याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. याचाच फायदा वाळू चोर घेत आहेत. अवैध वाळू चोरीची "टीप' देणाऱ्यांची नावे महसूल प्रशासन वाळू चोरट्यांकडे लगेच पोच करत असल्यामुळे महसूल विभाग संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वाळू चोरट्यांनी उंब्रजसह परिसरात दहशत निर्माण केलेली आहे, तर चिरिमिरीमुळे अनेक विभागांचे हात वाळू चोरांबरोबर गुंतले असल्याने वाळू चोरट्यांची गुंडगिरी वाढत असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे. 

मागील काही महिन्यांपासून वाळू चोरीची "टीप' देत असल्याच्या कारणावरून मारहाणीच्या घटना वाढत चालल्या आहेत. काही दिवसांपूर्वी "टीप' दिल्याच्या संशयावरून एकास फायटर, लोखंडी गजाने गंभीर मारहाण करण्यात आली आहे. याकडे संबंधित विभाग गांभीर्याने पाहणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे, तसेच उंब्रजमधील काही वाळू चोरट्यांची येथील शासकीय कर्मचाऱ्यांशी ऊठबस असल्याने वाळू चोरट्यांना खबरी देणाऱ्यांचे नाव शासकीय कर्मचारीच देत असल्याचे स्थानिक नागरिकांतून बोलले जात आहे. वाळू चोरीबाबत ग्रामस्थांनी तक्रार केली असता संबंधित चोरटे तक्रारदारास दम देत आहेत. याकडे महसूल विभागाने डोळेझाक करत झोपेचे सोंग घेतले आहे. कोणत्याही बाबीची तमा न बाळगता अल्पावधीत बक्कळ पैसा कमवण्याच्या नादात वाळू चोरटे नदीपात्राची अक्षरशः चाळण करत आहेत. नदीपात्र खरवडून काढले आहे. 

नदी काठावरील शेते जाताहेत वाहून! 

अवैध वाळू उपशामुळे पावसाळ्यात नदी काठावरील शेतकऱ्यांची शेते वाहून जात आहेत, तर वाळू चोरट्यांच्या दहशतीमुळे खुनासारखी मोठी घटना होण्याची भीती नागरिकांत निर्माण झाली आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाने जाणून-बुजून दुर्लक्ष करत असल्याची चर्चा नागरिकांत जोरदारपणे सुरू आहे. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: दंड की चेष्टा? BMC अधिकाऱ्यांना हायकोर्टानं ठोठावला ११ रुपयांचा दंड, २ दिवसाची दिलीय मुदत; प्रकरण काय?

Kolhapur Prisedant : पहिल्या अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; सव्वा वर्षाचा कालावधी, महायुतीतील सर्वच घटक पक्षांना मिळणार संधी

UPI Transaction : UPI लिमिटमुळे पेमेंट फेल? जाणून घ्या कशी वाढवायची व्यवहार मर्यादा

घराबाहेर येताच ओमकार आणि आयुषमध्ये हाणामारी, नॉमिनेट का केलं? म्हणत ओमकार धावून गेला आयुषच्या अंगावर, Viral Video

8th Pay Commission च्या नावाखाली मोठी फसवणूक; चुकूनही डाउनलोड करू नका 'हे' नवीन अ‍ॅप, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT