Satara Latest Marathi News 
सातारा

राज्यात कोरोनाचा कहर, तरीही नागरिकांची बेफिकीरी; भाजी मंडईसह अन्य ठिकाणी बिनधास्त गर्दी

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असतानाही नागरिकांची बेफिकीरी सुरुच आहे. एका शालेय मुलांसह दोन दिवसात 40 बाधित वाढूनही कोणालाच कोरोनाचे गांभीर्यच नसल्याची स्थिती शहरासह तालुक्यात आहे. अजूनही भाजी मंडईसह अन्य ठिकाणी नागरिक, महिला बिनधास्तपणे गर्दी करत आहेत. त्यामुळे हे लोकच सुपरस्प्रेडर होवून बाधितांची संख्या वाढवतील, अशी शक्यता आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याचे लोण आता शहरासह तालुक्यातही पोहचले आहे. एकीकडे रुग्ण वाढत असतानाही अनेक नागरिकांत त्याचे गांभीर्यच नसल्याचे दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निर्बंध जारी केले आहेत. मात्र, तरीही अनेकजण बेफिकीरीने वागत असल्याचे चित्र दिसत आहे. अनेकजण अजूनही विनामास्क फिरताना दिसत आहे. त्याचबरोबर अनेकांना पहिल्यासारखी या प्रादुर्भावाची काळजीही वाटत नाही. त्यामुळे बिनधास्तपणे सर्वजण वागत आहे. त्यामुळेच कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून सध्या कोरोनाचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. 

लसीकरण सुरु असतानाही शहरासह तालुक्यात बाधितांची संख्या वाढत आहे. तालुक्यातील घारेवाडीतील अपवाद वगळता अन्य ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात बाधीतांची संख्या नसली तरी गावांची संख्या वाढत आहे. त्यामुळे भीती व्यक्त होत आहे. शहरासह तालुक्यात दोन दिवासात ४० रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे शहरासह तालुक्याची चिंता वाढू लागली आहे. सध्या कऱ्हाड शहरात सात, मलकापूरमधील सात, विद्यानगर तीन, तांबवे, आटके, आगाशिवनगर, कोयना वसाहत, कार्वेनाका येथील प्रत्येकी तर  घोगाव, ओंड, बिचुद, वडगाव हवेली, कार्वे, खुबी, गोवारे, पेरले, तारुख, काले, मसुर, पाली, गोळेश्वर येथील प्रत्येकी एकजण बाधित झाला आहे. त्यामध्ये एका शाळेच्या मुलाचाही समावेश आहे. त्याचा विचार करुन आता प्रत्येकाने जबाबदारीने वागणे हाच यावरील उपाय आहे.

कऱ्हाड तालुक्यातील सर्वांनी कोरोनाची त्रिसुत्री पाळावी. प्रत्येकाने स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी तरी आवश्यक ती काळजी घेवून जबाबदारीने वागुण कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न करावा.  

-डॉ. संगीता देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी, कऱ्हाड

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये ट्रॅक्टर वेल्डिंगवेळी स्फोट, चौघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Uruli Kanchan Ganpati Visarjan : उरुळी कांचन येथील गणेश विसर्जन मिरवणूक रंगली १५ तास! मात्र डीजेला दिला मंडळानी फाटा

Beed News : करपलेली पिके अन् डोळ्यात अश्रू... बीडच्या बांधावर 'पालकमंत्री' सुनेत्रा पवार अन 'पंकजाताई मुंडे'

SCROLL FOR NEXT