सातारा

करवडी, विहापुरातून दुचाकी चोरल्याप्रकरणी एकजण कऱ्हाड पोलिसांच्या ताब्यात

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : करवडी (ता. कऱ्हाड) व विहापूर (ता. कडेगाव) येथून दोन दुचाकी चोरल्याप्रकरणी विहापूर येथील एकास पोलिसांनी ताब्यात घेतले. राजन मधुकर भोसले (वय 21, रा. विहापूर) असे ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे. संबंधिताकडून चोरीस गेलेल्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली. 

पोलिसांची माहिती अशी, करवडी येथील किशोर पिसाळ यांनी त्यांची घरासमोर पार्किग केलेली दुचाकी आठ दिवसापूर्वी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. त्याची तक्रार त्यांनी तालुका पोलिसात दिली होती. त्याचा तपास करताना साकुर्डी (ता. कऱ्हाड) गावाजवळ पोलिसांना एक संशयित मोटारसायकलस्वार पाटणकडुन कऱ्हाडकडे येत असल्याचा दिसला. त्याला थांबवून दुचाकीच्या कागदपत्राची विचारणा केल्यावर त्याला अपेक्षीत माहिती देता आली नाही. त्यावरुन पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे सवीस्तर चौकशी केल्यावर त्याने करवडी येथून मोटारसायकल चोरल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्याने विहापूर येथूनही आणखी एक दुचाकी चोरल्याचे सांगितले. 

पोलिसांनी संबंधिताकडून दोन्ही मोटारसायकल जप्त केल्या आहेत. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, पोलीस उपाधीक्षक डॉ. रणजित पाटील, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली कऱ्हाड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उत्तम कोळी, सज्जन जगताप, शशिकांत काळे, अमित पवार, शशिकांत घाडगे, सागर बर्गे यांनी केली. संबंधित संशयीतावर त्याच्यावर कडेगाव पोलीस ठाण्यातही मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडुन आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. हवालदार लावंड तपास करत आहेत.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT