Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News 
सातारा

पुसेगावातील तरुणांनी लावली जिवाची बाजी; अथक परिश्रमानंतर विझविला करंजाळ्यातील वणवा

ऋषिकेश पवार

विसापूर (जि. सातारा) : पुसेगाव (ता. खटाव) येथील करंजाळा शिवारातील टेकडीवर शनिवारी (ता. 27) दुपारी वणवा लागला होता. काही वेळातच हा वणवा शिवारात पोचून हाताशी आलेल्या पिकांची तसेच झाडे-वेली, सरपटणारे प्राणी यांची मोठी हानीची शक्‍यता होती. मात्र, तृणाल जाधव आणि रोहित जाधव या दोन तरुणांनी जिवाची बाजी लावत तत्परतेने हा वणवा विझवून मोठी हानी टाळली. 

तृणाल व रोहित हे करंजाळा शिवारातील शेतात गेले असता टेकडीवर वणवा लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता वणवा विझविण्यासाठी टेकडीच्या दिशेने धाव घेतली. दोघांनीही निर्गुडीचा पाला, मक्‍याची ताटे यांच्या साहाय्याने आग विझविण्यास सुरवात केली. मात्र, जोराचा वारा असल्याने सुरुवातीला आग काही केल्या आटोक्‍यात येत नव्हती. मात्र, दोघांच्या दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्‍यात आली व पर्यावरणाचे होणारे नुकसान टळले. त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

दरम्यान, नैसर्गिक तसेच मानवी हस्तक्षेपातून लागणाऱ्या वणव्यांमुळे वनसंपदेची मोठी हानी होते. बऱ्याचदा, या वणव्यात वन्यजीवही होरपळत असतात. आगीमुळे तृणभक्षी प्राण्यांचा आहार नष्ट होतो. जमिनीची जलधारण क्षमता कमी होते, यासारखे अनेक तोटे वणव्यामुळे झालेले पाहावयास मिळतात. परिणामी वणवे लागून वनसंपदेसह वन्यजीवांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी वन विभागाने उपाययोजना करून दक्षता घ्यावी, अशी मागणी येथील नागरिक करत आहेत. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुरात शतकाच्या उंबरठ्यावर, सीएसके गाठणार का 200 चा टप्पा

Video : दैव बलवत्तर! छतावरुन कोसळणाऱ्या चिमुकल्याला कसोशीने वाचवलं; व्हिडीओ व्हायरल

Pune Weather Update : बारामतीकरांनी अनुभवला उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस

Virat Kohli GT vs RCB : मी गेली 15 वर्षे खेळतोय याला काहीतरी... विराट स्ट्राईक रेटवरून बोलणाऱ्यांना दिलं कडक उत्तर

Latest Marathi News Live Update : ...तरीही ममतांनी शेख शाहजहानला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला- नड्डा

SCROLL FOR NEXT