Satara Latest Marathi News 
सातारा

धोकादायक! खासगी क्षेत्रात आगीमुळे वनक्षेत्र धोक्‍यात; दीड हजार हेक्‍टर क्षेत्राची झाली राख

उमेश बांबरे

सातारा : सातारा तालुक्‍यातील खासगी मालकीच्या डोंगर क्षेत्रांना आगी लागण्याच्या घटनांमध्ये गेल्या दहा दिवसांत वाढ झाली आहे. या आगीमुळे विविध भागांतील सुमारे दीड हजार हेक्‍टरवरील खासगी, तसेच लगतच्या तीन हेक्‍टरवरील वनक्षेत्राची राख झाली आहे. आगामी काळात वणवा, आगीमुळे वनक्षेत्राचे जास्तीचे नुकसान होऊ नये, यासाठी वन विभागाने आवश्‍यक त्या उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. 

सातारा तालुक्‍याच्या विविध भागात वन विभागाचे मोठे क्षेत्र असून, त्यालगतचे अनेक डोंगर खासगी मालकीचे आहेत. खासगी क्षेत्राचा वापर अनेक गावांमध्ये चराईसाठी होतो. या चराई क्षेत्रातील चाऱ्याची कापणी झाल्यानंतर त्याठिकाणी अनेकदा जाणीवपूर्वक आग लावण्यात येते. समज-गैरसमजातून खासगी क्षेत्रात लावलेली आग भडकल्यानंतर त्याचा फटका लगतच्या वनक्षेत्राला सुध्दा बसत आहे. या घटना रोखण्यासाठी वन विभाग दरवर्षी जाळरेषा तयार करते. या जाळरेषा असतानाही भडकलेल्या आगीची झळ शेजारील वनक्षेत्रालाही बसत आहे.

गेल्या 15 दिवसांत अशा प्रकारे आंबेदरे, महादरे, शेरवाडी, अजिंक्‍यतारा किल्ला, पेढ्याचा भैरोबा, करंडी, कास पठार परिसरातील खासगी तसेच वनक्षेत्रांना आगी लागल्या. आगीच्या माहितीनंतर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्याठिकाणी फायर ब्लोअर व इतर साम्रगीसोबत दाखल होऊन आग विझवितात. गत 15 दिवसांतील आगीत खासगी क्षेत्रातील सुमारे दीड हजार हेक्‍टरवरील झाडाझुडुपांची तसेच तीन हेक्‍टरवरील वनसंपदेची राखरांगोळी झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये खासगी तसेच वनक्षेत्रातील आगींमुळे तेथील अन्नसाखळी नष्ट झाली असून, तेथील वन्यप्राणी अन्नाच्या शोधार्थ आगामी काळात नागरी वस्तीत घुसण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे मानव आणि वन्यप्राणी यांच्यात संघर्ष होणार असून, तो टाळण्यासाठी नागरिकांनी वनसंपदेचे रक्षण करणे आवश्‍यक आहे. याचबरोबर नागरिकांनी आग लावणाऱ्यांची माहिती वन विभागास देणे गरजेचे आहे, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल राठोड यांनी केले. 

आगीवर सॅटेलाइट 'वॉच' राहणार 

डेहराडून येथे फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाचे कार्यालय असून, त्याठिकाणाहून देशभरातील वनक्षेत्र तसेच खासगी वनक्षेत्रावर सॅटेलाइटच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येते. वन, खासगी क्षेत्रात आग लागल्यास सॅटेलाइटव्दारे लोकेशन, फोटो व इतर माहिती मेसेजव्दारे संबंधित वन विभागास देण्यात येते. गेल्या 15 दिवसांत असे दहा फायर अलर्ट सातारा वन विभागास मिळाले आहेत. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

Pune Drone Cluster: पुण्यात ड्रोन अन् खाद्यप्रक्रिया क्लस्टर; राज्यातील पहिलाच उपक्रम, भोसरी, हडपसरमध्ये सुरू होणार प्रकल्प!

Pandharpur News: पंढरपुरातील प्रस्तावित कॉरिडॉरला तीव्र विरोध; सुब्रह्मण्यम स्वामींच्या मोहिमेस पाठिंबा देण्यासाठी बाधितांचा शंखनाद!

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Solapur News: भारताच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोष; पाकिस्‍तानला लाेळविताच आतषबाजी, पेढे वाटून, तिरंगा उंचावून आनंदोत्सव साजरा!

SCROLL FOR NEXT