Satara Latest Marathi News 
सातारा

कऱ्हाडात भुरट्या चोरांचा धुमाकूळ; एलईडी, नळतोट्यांसह पालिकेच्या साहित्यावर डल्ला

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : मध्यंतरी शहरातील पथदिव्यांचे एलईडी बल्ब चोरल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली. चोरीवर नेमका काय पर्याय काढायचा, याचे कोडे उलगडलेले नाही. त्यामुळे वर्भभरात हजारो रुपयांचे साहित्य हातोहात चोरट्यांनी लंपास केले. भुरट्या चोरट्यांची डोकेदुखी पालिकेत वाढली आहे. त्यामुळे पालिकेस आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. कार्वे नाका, शुक्रवारसह मंगळवार पेठेत अनेक स्वच्छता व शौचालयांत ही अवस्था आहे. त्यामुळे नवीन दिवे किंवा नळ बसवले की त्याच्या संरक्षणाची हमी नाही. 

पालिकेने शहरातील स्वच्छतागृहासह सार्वजनिक शौचालयांत विजेची व्यवस्था केली आहे. त्यासाठी बल्ब, स्विचची व्यवस्था केली आहे. त्याशिवाय नवीन नळही बसविले आहेत. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत कामांची पूर्तता सुरू आहे. पालिकेने बसवलेले नवीन बल्ब व विजेचे साहित्य चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवार, मंगळवार पेठेसह कार्वे नाका परिसरातील शौचालयांतून साहित्य चोरीस गेले आहे. चोरीवर पर्यायच नसल्याने पालिका कर्मचारी हतबल झाले आहेत.

भुरटे चोर पालिकेने बसवलेल्या साहित्यावर डल्ला मारताहेत. त्यामुळे नवीन ठिकाणी साहित्य बसविताना त्याच्या सुरक्षेचा विचार पालिकास्तरावर सुरू आहे. ज्या भागात वस्ती कमी आहे, रात्री लोक फिरकत नाहीत, अशी ठिकाणे चोरट्यांनी लक्ष्य केली आहेत. आरोग्य कर्मचारी काही वेळा फेरफटका मारून पाहणी करत आहेत. रात्री उशिरा त्या चोऱ्या होत असल्याने कर्मचाऱ्यांच्याही देखभालीच्या मर्यादा आहेत. 

I LOVE KARAD नंतर शहराच्या सौंदर्यात आणखी भर; टाकाऊपासून तयार झालेली शिल्पे ठरताहेत आकर्षण

स्थानिक लोकांकडूनही दुर्लक्ष 

स्वच्छतागृह व शौचालयांत नगरपालिका सुविधा देत आहे. मात्र, भुरट्या चोरांकडून ते साहित्य लंपास होत असेल तर त्या भागातील नागरिकांनी सामाजिक जबाबदारी म्हणून त्यावर नियंत्रणासाठी लक्ष ठेवण्याची गरज आहे. काही ठिकाणी लोक तसा प्रयत्न करतही आहेत. मात्र, नेमकी रात्र किंवा पहाटेची वेळ गाठून चोरटे साहित्य लंपास करत आहेत. त्यामुळे या भुरट्या चोरट्यांची पालिकेसाठी डोकेदुखी झाली आहे. 

वीज कनेक्‍शन तोडल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण; कोंडव्यात हॉटेल चालकासह दोघांवर गुन्हा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT