Satara Latest Marathi News 
सातारा

पुण्यातील मगरपट्टा सिटीप्रमाणे फलटणसह कोरेगावात मोठ्या कंपन्या आणू; सभापती रामराजेंची ग्वाही

किरण बोळे

फलटण शहर (जि. सातारा) : फलटण तालुक्‍याला केवळ कमिन्स कंपनीवर अवलंबून न राहता छोट्या-मोठ्या कंपन्याही तालुक्यात असणे आवश्यक आहे. आगामी काळात अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या कंपन्यांबरोबरच स्थानिक व्यावसायिकांना परिपूर्ण सुविधा देऊन व्यवसायवाढीसाठी व आर्थिक उन्नतीसाठी प्राधान्य राहणार असल्याचे मत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले. 

फलटण पंचायत समितीच्या सभागृहामध्ये अतिरिक्त औद्योगिक वसाहतीबाबत आयोजिलेल्या बैठकीत रामराजे बोलत होते. या वेळी आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप, महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत महामंडळाचे उपविभागीय अधिकारी इंगळे आदींची या वेळी उपस्थिती होती.

सभापती रामराजे म्हणाले, "पुणे येथे असणाऱ्या मगरपट्टा सिटीप्रमाणे तेथील विकसन करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या भागीदारीमधून ज्याप्रमाणे औद्योगिक वसाहत उभी करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर फलटण येथेही अतिरिक्त औद्योगिक वसाहत तालुक्‍यातील मिरगाव, ढवळेवाडी व नांदल या गावांमध्ये उभी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान न होता पुणे येथे मगरपट्टा सिटीचा ज्याप्रकारे विकास करण्यात आला आहे. त्याप्रकारे फलटण येथे अतिरिक्त औद्योगिक वसाहत उभारून तालुक्‍यातील शेतकऱ्यांना व शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार निर्माण करून आगामी काळामध्ये तालुक्‍यामध्ये उत्तम प्रकारे चालणारी कंपनी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

त्याचबरोबर कोरेगाव तालुक्‍याच्या उत्तर भागामध्ये असणाऱ्या नांदवळ, करंजखोप येथील माळरानावरही औद्योगिक वसाहत उभी करून येथील स्थानिकांना रोजगार देण्याचा प्रयत्न आहे. येथून जवळूनच महामार्ग जात असल्याने तेथील जागांना नक्कीच मोठमोठ्या कंपन्या पसंती देतील.'' सध्या असलेल्या भावांपेक्षा निश्‍चितपणे जादा दर औद्योगिक वसाहतीमध्ये जाणाऱ्या जमिनींना देण्यात येईल, असे रामराजे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले. प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांना याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करावा, असे निर्देशही त्यांनी दिले.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT