सातारा

आरोग्य कर्मचारी, डॉक्‍टरांना पहिल्या टप्प्यात लस : जिल्हाधिकारी शेखर सिंह

उमेश बांबरे

सातारा : कोरोनाची लस देण्याबाबत केंद्र सरकारने सूतोवाच केले आहे. या पार्श्‍वभूमीवर पहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्यांना कोविड लस देण्याबाबतचा आराखडा मागितला आहे. त्यामध्ये शासकीय, खासगी डॉक्‍टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्याबाबतचे नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज केल्या.
 
जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड लशीबाबत सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्या वेळी त्यांनी काही सूचना केल्या. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व इतर विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

श्री. सिंह म्हणाले, ""कोरोना लस ठेवण्यासाठी लागणाऱ्या स्टोरेजबाबत नियोजन केले जात आहे. त्यासाठी जिल्ह्यात 96 फ्रीज (आयएलआर) असून, त्यांची क्षमता एक हजार 970 लिटर आहे, तर डीप फ्रीजची क्षमता तीन हजार लिटरहून अधिक आहे. खासगी डॉक्‍टरांनी स्वत:साठी आपल्याकडे कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड लस देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या लिंकवरील https://docs.google.com/spreadsheets/d/IRGcKEJzPwtqMbeYWAF-YjBqHYtHNVeBpQ/edit?usp=sharing स्प्रेड शिटमध्ये माहिती भरावी, असे आवाहन सिंह यांनी केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule: ‘कर्जमाफी अन् सातबारा कोरा होईपर्यंत स्वस्थ बसू देणार नाही’; पंढरपुरात सुप्रिया सुळे आक्रमक, तुरुंगात जावे लागले तरी चालेल

'अंबा येडू दोघी बहिणी…’ ऐश्वर्या नारकरांसोबत लेकीचाही ठसकेबाज डान्स! VIDEO VIRAL

Asian Games, IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कशी असू शकते Playing XI? कुठे पाहाणार उपांत्यपूर्व सामना?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

सरकारने माझ्या मागण्या मान्य केल्या, ३० दिवसांचा रिचार्ज, डेटाशिवाय प्लान मिळणार; राघव चड्ढांची पोस्ट

SCROLL FOR NEXT