Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News 
सातारा

'नीरा-देवघर'चे काम त्वरित पूर्ण करू; प्रकल्पाधिकारी डुबलांची ग्वाही

अशपाक पटेल

खंडाळा (जि. सातारा) : नीरा-देवघर प्रकल्पाच्या वितरिकांची कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची ग्वाही नीरा-देवघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल यांनी दिली. 

खंडाळा तालुका विकास प्रतिष्ठानच्या वतीने कार्यकारी अभियंता श्री. डुबल व नीरा-देवघर प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांसमवेत खंडाळा तालुक्‍यातील "नीरा-देवघर'च्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये रब्बी पिकांसाठी पाणी आवर्तन, तसेच मंजूर वितरिकांची कामे पूर्ण करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन तालुका विकास प्रतिष्ठानचे सचिव डॉ. विजय शिंदे यांनी दिले. त्यावर श्री. डुबल यांनी वरील ग्वाही दिली.

लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज तत्काळ कार्यालयात जमा करावेत. त्याचप्रमाणे पाणीपट्टी भरावी. ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर पाणी आवर्तन देण्यात येईल. त्याचप्रमाणे वितरिकांची कामे लवकरात लवकर पूर्ण करून त्या प्रवाहित करण्यात येतील, असे आश्वासनही श्री. डुबल यांनी शेतकऱ्यांना दिले. या वेळी डॉ. शिंदे, अशोक पवार (भादवडे), नामदेव कराडे (कराडवाडी) व लाभक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT