Satara Latest Marathi News 
सातारा

आधुनिक लष्करी प्रशिक्षणासोबत शिवकालीन युद्धकला आत्मसात करा : लेफ्टनंट पवारांचे आवाहन

दिलीपकुमार चिंचकर

सातारा : स्वसंरक्षणासह पारंपरिक युद्धकलेत निपुण होण्यासाठी येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींनी तलवारबाजीचे धडे घेतले. कॉलेजमध्ये झालेल्या युद्धकौशल्य कार्यशाळेस मुला-मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

कॉलेजमधील मिलिटरी सायन्स विभाग व राष्ट्रीय छात्रसेना विभागाच्या वतीने राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान योजनेअंतर्गत शिवकालीन पारंपरिक युद्धकौशल्य कार्यशाळा नुकतीच झाली. कार्यशाळेत राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी व छत्रपती शिवाजी मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षण अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन पारंपरिक युद्धकौशल्याचा सराव केला. राष्ट्रीय छात्रसेना विभागाचे कंपनी कमांडर प्रा. केशव पवार, अॅकॅडमी प्रशिक्षक हवालदार विक्रम घाडगे व सैनिक कमांडो अॅकॅडमीचे प्रशिक्षक सागर लोहार, रोहित कांबळे, प्रिया मोरे, प्रीती लिंगायत यांनी विद्यार्थ्यांना लाठी-काठी, दांडपट्टा, तलवारबाजी व धनुर्विद्येचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थिनी चपळाईने तलवारीचे डाव सादर करत होत्या. लांबलचक दांडपट्टेही त्या लीलया फिरवीत होत्या. त्यांच्या या कौशल्याचे सर्वांनी कौतुक केले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना रायफल शूटिंगचेही प्रशिक्षण देण्यात आले. प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

संभाजीराजेंच्या बलिदानानंतर रायगड 1689 मध्ये मोगलांच्या ताब्यात; कसा सोडविला खंडेरावांनी गड वाचा सविस्तर..
 
यावेळी प्रा. डॉ. सुभाष वाघमारे म्हणाले, "सैनिकी शिक्षणात भारतीय स्वातंत्र्य चळवळ व संविधानाची पूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देणे आवश्‍यक आहे. जगाला बुद्ध हवा असून, जागतिक शांततेची गरज असते. पण, देशाच्या हितासाठी, सरंक्षणासाठी युद्ध करण्याची वेळ आली तर मनगटाचे व मेंदूचे सामर्थ्य उपयोगी ठरते, म्हणून युद्धकौशल्य जीवनाचा अपरिहार्य भाग आहे.'' प्रा. लेफ्टनंट केशव पवार यांनी विद्यार्थ्यांना आधुनिक लष्करी प्रशिक्षणासोबत शिवकालीन पारंपरिक युद्धकला आत्मसात करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेसाठी प्रा. राम गाडेकर, बटालियन सिनियर अंडर ऑफिसर सौरभ धानी, सिनियर अंडर ऑफिसर नेहा कणसे, यश मोरे, काजोल पवार, सार्जंट खुशी जांगीड, ऍकॅडमी प्रशिक्षक मयूरी जाधव, अपूर्वा मुंद्रावळे यांनी विशेष परिश्रम घेतले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT