Satara Latest Marathi News, Satara News 
सातारा

लोणंदात झालेल्या भयानक अपघातातील दोषींवर कडक कारवाई करा; पालकमंत्र्यांचे आदेश

अशपाक पटेल

खंडाळा (जि. सातारा) : शेळकेवस्ती-लोणंद येथे झालेल्या भयानक अपघातातील दोषींवर कडक कारवाई करावी व भरधाव वेगात येणाऱ्या वाहनांवर ताबा मिळविण्यासाठी पोलिस प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या. 

दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात शेळकेवस्ती येथील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला होता. माजी सैनिक भगवान धायगुडे कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी ते शेळकेवस्ती येथे आले होते. यावेळी आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, माजी कृषी सभापती मनोज पवार, लक्ष्मणराव शेळके, सुभाष घाडगे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी उपस्थित होते. 

यावेळी मकरंद पाटील यांनी खंडाळा-लोणंद अरुंद रस्त्याच्याबाबत पालकमंत्र्यांना माहिती देऊन येथे लवकर अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज स्पष्ट केली. त्यावर लवकरच निर्णय घेण्याची ग्वाही पालकमंत्री पाटील यांनी दिली. यावेळी धायगुडे कुटुंबीयांना पालकमंत्री व आमदार पाटील यांनी धीर दिला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कसोटी क्रिकेटमध्ये मोठा बदल! अंधार पडताच होणार नवा नियम लागू; ICC ने घेतले मोठे निर्णय

६ जूनला रायगडावर इतिहास जिवंत होणार! शिवराज्याभिषेक सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, शिवरायांचा उत्सव चुकवू नका

Pune Politics: महापालिकेपासून विधान परिषदपर्यंत ‘साखरपेरणी’; विक्रम काकडेंच्या उमेदवारीमागील राजकीय गणित, पुण्यात दोन दिवसांतच फिरली समीकरणे

Yavatmal: वैद्य नगरातील जुगारावर छापा; 12 जुगारी अटकेत; अवधूतवाडी पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Live Update : कांद्याला हमीभावासाठी मंचरमध्ये आज शेतकरी पुणे नाशिक महामार्ग रोखणार

SCROLL FOR NEXT