सातारा

दुष्काळी भागातील रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री पाटील

आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊन विकासकाम करण्याचे महाविकास आघाडी शासनाचे धोरण आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील रखडलेल्या कामांना गती देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. 

गुरसाळे (ता. खटाव) येथे नागरी सत्कार व पक्ष प्रवेश कार्यक्रमात पालकमंत्री पाटील बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार प्रभाकर घार्गे, निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, माजी सभापती संदीप मांडवे, प्रा. बंडा गोडसे, जितेंद्र पवार, ऍड. विलासराव इंगळे, सी. एम. पाटील, शिवाजीराव सर्वगोड, बाळासाहेब पोळ, प्रतीक विधाते, जयदीप शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री पाटील म्हणाले, "साखर कारखान्यांना थकहमी देताना पक्ष, गट, तटाचा विचार केला नाही. विविध कारखान्यांना 516 कोटी रुपयांची थकहमी राज्य शासनाने बॅंकांना दिली आहे. साखर कारखानदारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अर्थकारणाला गती देण्याचा प्रयत्न केला जाईल. गुरसाळे परिसरातील रस्ते, आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्यासंदर्भात नजीकच्या काळात ठोस भूमिका घेतली जाईल. राष्ट्रवादी कॉंग्रेसबरोबर काम करणाऱ्या प्रत्येकाला मानसन्मान दिला जाईल.'' 

श्री. घार्गे म्हणाले, "ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडी शासनातील घटक पक्ष विरोधक म्हणून समोर असणार आहेत. अशा स्थितीत प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण विचार करून निवडणूक लढवावी.'' प्रभाकर देशमुख यांनी येरळवाडी धरण परिसरात अभयारण्य केल्यास शेतकऱ्यांवर त्याचे गंभीर परिणाम होणार असल्याने पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी केली. संदीप मांडवे यांचेही भाषण झाले. बळीराम वाघ यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ कार्यकर्ते बबनराव मांडके, विष्णूभाऊ जाधव, प्रतापराव जाधव यांनी स्वागत केले. कार्यक्रमास अंबवडे सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय पवार, माजी सरपंच देविदास पवार, सुखदेव पवार, शशिकांत जाधव, बाळासाहेब पोळ, शांताराम पवार, साहेबराव पाटोळे, खुदबुद्दीन शिकलगार आदी उपस्थित होते. 

मान्यवरांचा प्रवेश : कार्यक्रमात गुरसाळेचे माजी उपसरपंच खुदबुद्दीन शिकलगार, तंटामुक्तीचे अध्यक्ष साहेबराव पाटोळे, विश्‍वास जाधव, बाजीराव जाधव, विष्णू मांडके आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. लातूरमधील मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड

Sunita Williams: सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी तुर्तास स्थगित; या कारणासाठी मोहीम पुढे ढकलली

Rohit Sharma Crying : पुन्हा एकदा फ्लॉप ठरल्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये रोहित शर्माला अश्रू अनावर; व्हिडिओ व्हायरल

Women Abuse Case : मोठी बातमी! परदेशातून परतताच विमानतळावर 'या' खासदाराला होणार अटक? एसआयटी झाली सतर्क

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

SCROLL FOR NEXT