सातारा

सत्ताधारी पक्षाचाच आमदार असल्याने शिक्षकांचे प्रश्न सुटणार : जयंत आसगावकर

सलीम आत्तार

पुसेगाव (जि. सातारा) : महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख व घटक पक्षांच्या प्रयत्नांमुळे शिक्षक मतदारसंघातून आमदारकी मिळाली. सत्ताधारी पक्षाचाच आमदार असल्याने शिक्षकांचे, तसेच विविध संस्थांचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडवण्यात आपणास यश मिळाले असून अनेक प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत, असे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी नमूद केले. 

श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध शाखांतर्फे श्री हनुमानगिरी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आसगावकर यांचा सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष विश्वनाथराव जाधव होते. कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव म्हणाले, ""माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय नियोजनपूर्वक काम व प्रचार झाल्याने मतदारांनी आसगावकर यांना विजयी केले.'' 

यावेळी डॉ. संजय क्षिरसागर यांचे भाषण झाले. संजय गुलाबराव जाधव यांनी प्रास्ताविक केले. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त मोहनराव जाधव, योगेश देशमुख, मानाजीराव घाडगे, प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे, प्रा. अच्युतराव माने, प्राचार्य डी. बी. काळे, एस. व्ही. माने उपस्थित होते. सौ. एम. एस. चव्हाण यांनी आभार मानले. मोहनराव गुरव यांनी सूत्रसंचालन केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस; गुजरातच्या प्लेइंग-11 मध्ये मोठे बदल

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT