Satara Latest Marathi News 
सातारा

रुग्णसंख्या वाढली तर लॉकडाउन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही : आमदार पाटील

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : राज्यात व जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. संसर्गाचा वेग दुप्पट आहे. त्यासाठी प्रशासनातील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी सतर्क राहून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना नागरिक व व्यापाऱ्यांना कडक शिस्त लावून कोरोनाबाबत दिलेले निर्बंधाचे काटेकोर पालन करण्यास भाग पाडले तरच आगामी काळातील लॉकडाउनचे संकट रोखता येईल, असा विश्वास आमदार मकरंद पाटील यांनी व्यक्त केला. 

वाई विधानसभा मतदारसंघातील कोरोनाचा आढावा घेण्यासाठी येथील पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात बोलाविण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तसेच वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्‍यातील आरोग्य, महसूल, पंचायत समिती, पोलिस प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते. श्री. पाटील म्हणाले, ""जानेवारीपासून पुन्हा बाधितांची संख्या वाढत आहे. या दुसऱ्या टप्प्यात संसर्गाचा वेग दुप्पट आहे. त्यामुळे त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला अटकाव करण्यासाठी सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हातात हात घालून व कर्तव्य भावनेतून जबाबदारीने प्रयत्न करावेत.

रुग्णसंख्या वाढली तर लॉकडाउन करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिक व व्यापारीवर्गाबरोबर प्रशासनाला होईल. त्यासाठी कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत म्हणून शासनाच्या नियमानुसार प्रतिबंधत्मक उपाय करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. प्रांताधिकारी संगीता राजापूरकर यांनीही मार्गदर्शक सूचना केल्या. मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी स्वागत केले. तहसीलदार रणजित भोसले यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT