Satara Latest Marathi News Satara News 
सातारा

यशवंतरावांच्या आत्मचरित्रातील 'कृष्णा-कोयना' अनुभवण्यासाठी सुप्रिया सुळे थेट प्रीतिसंगमावर

सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) : ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्रातील कृष्णा-कोयना प्रीतिसंगमावरील सायंकाळचे वर्णन वाचल्यानंतर त्याचा अनुभव घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) काल (शुक्रवार) सायंकाळी सहाच्या सुमारास येथील प्रीतिसंगमावर उपस्थिती लावली. 

काही कार्यक्रमानिमित्त सुळे कोल्हापूर येथे आल्या होत्या. तेथून परतताना त्यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी भेट देऊन सायंकाळची अनुभूती घेतली. त्यांच्या समवेत लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नंदकुमार बटाणे, संजय पिसाळ, राहुल भोसले, सौ. खेतमर उपस्थित होते. कोल्हापूर येथून खासदार सुळे पुण्याला जाताना ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाला भेट देण्याचे ठरवले. त्यानुसार सौरभ पाटील यांना त्यांनी निरोप दिला. त्यानुसार श्री. पाटील व त्यांचे सहकारी यांनी प्रीतिसंगमावर (Preetisangam) खासदार सुळे यांचे स्वागत केले.

त्यानंतर सुळे कृष्णा काठावरील सायंकाळची अनुभूती घेण्यासाठी त्या समाधीस्थळाकडे गेल्या. कृष्णा काठावरील सायंकाळची अनुभूती घेतली. त्या वेळी त्यांनी तो परिसरही पाहिला. त्याची माहिती सौरभ पाटील यांच्याकडून घेतली. त्या वेळी त्यांनी समाधिस्थळासमोरील सैदापूर व गोटे परिसराचाही विकास होण्याची गरज आहे. त्यानुसार त्याबाबत योग्य त्या खात्याला सूचना देण्यात येईल, असेही स्पष्ट केले. खासदार सुळे तेथून परताना त्यांनी समाधिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या युवक, युवतींशीही संवाद साधला. त्या वेळी आजच्या पिढीतही ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दलची उत्सुकता व आदर पाहून त्याही समाधानी झाल्या.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकीला उपचारासाठी घेऊन आलेल्या बापाला महिला डॉक्टरनं मारली कानाखाली; सरकारी दवाखान्यातला VIDEO VIRAL

Hasan Mushrif : हसन मुश्रीफांचा सार्वजनिक बांधकाम विभागावर संताप, कामातील दिरंगाईवर अधिकाऱ्यांना खडे बोल

Latest Marathi News Live Update : पुणे जैन हॉस्टेल सुनावणी प्रकरणी अपडेट

Market Today : MCX वर ट्रेडिंग ठप्प! गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण

Gastroenterologist warning: रिकाम्या पोटी अजिबात आंबट पदार्थांसह 'हे' 2 पदार्थ खाऊ नका, गॅस्ट्रोलॉजिस्टने व्हिडिओ शेअर करत दिली कारणे

SCROLL FOR NEXT