Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News 
सातारा

साताऱ्याच्या मध्यभागी असणाऱ्या कारागृहामुळे शहराच्या विकासाला खीळ : उदयनराजे

गिरीश चव्हाण

सातारा : सातारा शहराच्या मध्यभागी असणारे जिल्हा कारागृह स्थलांतरित करण्यासाठीच्या प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या असून, नवीन प्रस्तावित कारागृहासाठीच्या क्षेत्रमाहुली येथील जागेची नुकतीच खासदार उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली. 

या वेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, बाजार समितीचे संचालक काका धुमाळ, कारागृह प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच कर्मचारी उपस्थित होते. सातारा शहराच्या मध्यवर्ती भागात जिल्हा कारागृह आहे. कारागृह नियमावलीनुसार या परिसरातील इमारतींचे विकसन काही वर्षांपासून रखडले आहे. हे रखडलेले विकसन मार्गी लागावे, यासाठी राज्य शासनाकडे खासदार उदयनराजे यांनी पाठपुरावा केला होता. 

यानुसार कारागृह परिसरातील इमारत उंचीच्या नियमात थोडी शिथिलता आणण्यात आली. शिथिलता आली असली, तरी त्या भागातील रहिवासी, व्यापारी संकुलांचे विकसन रखडले होते. यामुळे शहराच्या मध्यभागी असणारे कारागृह स्थलांतरित करण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून आज खासदार उदयनराजेंनी क्षेत्रमाहुली येथील गायरानाच्या जागेची पाहणी केली. पाहणीनंतर उदयनराजे म्हणाले, ""शहराच्या मध्यभागी असणाऱ्या कारागृहामुळे शहराच्या विकासाला खीळ बसली असून, ते स्थलांतरित करणे काळाची गरज आहे. यामुळेच या जागेची पाहणी करण्यात आली असून, त्यासाठीचा पाठपुरावा सुरू आहे.'' 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT