सातारा

बिनविरोध ग्रामपंचायतीला 'एक पेटी वाचनालय'; संस्कृती कलामंचचा कोरेगाव तालुक्‍यात उपक्रम

दिलीपकुमार चिंचकर

सातारा : निवडणुकीच्या रणधुमाळीने गावात तेढ वाढू नये, निवडणुकीसाठी गावाचा पैसा खर्च होऊ नये यासाठी कोरेगाव तालुक्‍यात संस्कृती कलामंच या सामाजिक संस्थेच्या वतीने संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध निवडून देणाऱ्या गावास "एक पेटी वाचनालय' तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येईल, अशी योजना जाहीर करण्यात आली आहे. 

या बाबतची माहिती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष यशेंद्र क्षीरसागर यांनी दिली. बिनविरोध ग्रामपंचायतीच्या गावातील सर्व इच्छुक तरुणांना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची सोय केली जाईल, अशीही घोषणा या योजनेत करण्यात आली आहे. गावामध्ये गट तसेच मतभेद असतील तर स्वयंपूर्ण तसेच सर्वस्पर्शी विकास होऊ शकत नाही. एकदिलाने आपले प्रतिनिधी निवडले तर संपूर्ण गाव एकत्र राहते आणि आदर्श गावाची निर्मिती होते. महाराष्ट्रात अनेक गावांनी तसा आदर्श घालून दिला आहे. अशा पद्धतीने बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना जाहीर करीत असल्याचे श्री. क्षीरसागर यांनी सांगितले. 

गावांसमोर अनेक आव्हाने असतात. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सर्व गावाने मतभेद विसरून एकत्र यावे. व्यसनाधिनता, गुन्हेगारी, बेरोजगारी, पाणीप्रश्न असे अनेक प्रश्न सोडवायचे असतील तर एकत्र येणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणे हे महत्त्वाचे पाऊल ठरेल. तसा आदर्श ग्रामपंचायतींनी घालून द्यावा, यासाठी ही योजना जाहीर करण्यात येत आहे, असे पत्रकात म्हटले आहे. बिनविरोध निवडणुका करणाऱ्या गावात वाचण्याची संस्कृती आणि संस्कार रुजावे म्हणून सर्व प्रकारची पुस्तके तसेच सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते या गावाचा सत्कार करण्यात येईल. तसेच गावातील सर्व तरुणांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मोफत विविध सत्रांमध्ये घेतले जाईल, असाही योजनेत समावेश आहे. गावकऱ्यांनी बिनविरोध निवडणुकीचा प्राधान्याने विचार करावा, असे आवाहन श्री. क्षीरसागर यांनी केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: पुणे जिल्ह्यात दाेन दिवसांपासून अवकाळीने शेतीचे नुकसान: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अँक्शन मोडवर, तातडीने पंचनाम्याचे निर्देश!

Dhurandhar 2 ने पहिल्याच दिवशी कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला, बॉलिवूडच्या ओपनर सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडले

Alphonso Mango Price : हापूसचा 'रुबाब' वाढला! 5 हजारांपासून 12 हजारांपर्यंत एक पेटी; सोन्याच्या दरात विकला जातोय कोकणचा राजा

Accident News : देवदर्शन ठरले अखेरचे ! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांंचा दुर्दैवी मृत्यू

Jalna News: परतूर तालुक्यात कामगार योजनेत मनमानी; वर्ष उलटले तरीही क्लेम रखडलेले

SCROLL FOR NEXT