Satara Latest Marathi News 
सातारा

धक्कादायक! खटाव तालुक्यात बेड शिल्लक नसल्याने महिलेवर रिक्षातच उपचार करण्याची वेळ

आयाज मुल्ला

वडूज (जि. सातारा) : ग्रामीण रूग्णालयात कोविड सेंटर बंद असल्याने आज येथे कोरोना बाधित एका महिला रूग्णाला रूग्णालयाच्या बाहेरच रिक्षामध्ये ऑक्सिजन लावावा लागला. याबाबत समजलेल्या माहितीनुसार, येथील ७५ वर्षीय एक वृद्ध महिला आज सकाळी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास कोरोना तपासणीसाठी आली होती. तपासणीनंतर संबंधित महिला कोरोना बाधित असल्याचे आढळून आले. 

त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेची ऑक्सिजन लेवलची तपासणी केली असता ती कमी होती. त्यातच ग्रामीण रूग्णालयातील कोव्हिड सेंटर बंद होते. आजपासून ते कार्यान्वित करण्यात येणार होते. मात्र, त्यासाठी आवश्यक ते वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आदी स्टाफ उपलब्ध न झाल्याने ते सेंटर सुरू होऊ शकले नाही. शिवाय ग्रामीण रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभाग सुरू असल्याने त्याठिकाणी रूग्ण होते. त्यामुळे संबंधित महिला रूग्णाला रूग्णालयाच्या बाहेरच एका रिक्षामध्ये ऑक्सिजन लावण्यात आला होता. 

त्यानंतर महिला रूग्णाच्या नातेवाईकांनी रूग्णवाहिकेसाठी संपर्क साधला. मात्र, तीन ते चार तास रूग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. त्यानंतर नातेवाईकांनी कोरेगाव येथील खासगी रूग्णवाहिकेशी संपर्क साधून त्या रूग्णवाहिकेने रूग्णाला साताऱ्याला नेले.  या घटनेची चर्चा आज शहरात सुरू होती. शहरात कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. ग्रामीण रूग्णालयातील कोविड सेंटर तातडीने सुरू करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

प्रशासनाने लॉकडाउनचे कडक निर्बंध करून कोरोनावर आळा घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, शहरात गेल्या काही दिवसांत कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने येथील कोविड सेंटर सुरू करावे, अन्यथा कोरोना बाधित रूग्णांना शासकीय कार्यालयांत आणून दाखल करू.

-विजयकुमार शिंदे, अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना समिती

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT