Satara Latest Marathi News 
सातारा

अवैध धंद्यांवर कडक कारवाई करणार; पोलिस अधीक्षक बन्सलांचा इशारा

प्रवीण जाधव

सातारा : अवैध धंद्यांना जिल्ह्यात बिलकूल थारा दिला जाणार नाही. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस ठाण्याच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी दिला आहे. त्यामुळे पोलिस ठाण्यांना आता अधिक सतर्क व्हावे लागणार आहे. 

सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी दोन दिवसांपूर्वी करंजे परिसरात चाललेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर कारवाई केली. या वेळी 50 लोक एकाच ठिकाणी एकत्र जमून जुगार खेळत असल्याचे समोर आले. एखाद्या कंपनी किंवा कार्यालयात असते, तशी आधुनिक थम इंप्रेशनची यंत्रणा प्रवेशासाठी या अड्ड्यावर बसविण्यात आली होती. दीड वर्षाहून अधिक काळ हा अड्डा या ठिकाणी सुरू असल्याची माहिती कारवाईनंतर समोर आली आहे. प्रत्यक्ष कारवाईवेळीही भरवस्तीत चालणारा एवढा मोठा जुगार अड्डा सुरू असल्याचे पाहून कारवाई करणाऱ्या पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही धक्का बसला होता. त्यामुळे स्थानिक पोलिसांचे या अड्ड्याकडे दुर्लक्ष असल्याचे समोर आले. पोलिसांच्या निदर्शनास न येता हा अड्डा एवढे दिवस कसा सुरू होता, असा प्रश्‍नही सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. 

वास्तविक पोलिस अधीक्षकांनी पदभार स्वीकारल्यानंतरही अवैध धंदे कोणत्याही परिस्थितीत सुरू राहणार नाहीत, अशी भूमिका घेतली होती. तरीही शहरासह जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे अवैध धंदे सुरूच आहेत. त्यावर किरकोळ कारवाया होतातही. परंतु, पुन्हा धंदे त्याच ठिकाणी सुरू राहतात. त्यामुळे स्थानिक पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष आहे की काय, असा प्रश्‍न निर्माण होतो. करंजे परिसरातील कारवाईमुळे ते पुन्हा समोर आले. त्यामुळे पोलिस अधीक्षकांनी याबाबत कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याची भूमिका "सकाळ'ने मांडली होती. त्याची दखल घेत अवैध धंदे व त्यांना पाठीशी घालणाऱ्यांबाबत अधीक्षक बन्सल यांनी कठोर भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

अधीक्षक बन्सल म्हणाले, ""अवैध धंद्यांबाबत मी सुरवातीपासूनच कठोर भूमिका घेतली आहे. त्याबाबत सर्व पोलिस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना कागदोपत्री सूचनाही दिलेल्या आहेत. क्‍लब असो वा कोणत्याही अवैध धंद्यांना जिल्ह्यात कायदेशीर परवानगी नाही. त्यामुळे अशा गोष्टी समोर आल्यास त्याबाबतची जबाबदारी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निश्‍चित करण्यात येईल. त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.'' 

थेट संपर्क साधा : अजय कुमार बन्सल 

कोणत्याही प्रकारच्या अवैध धंद्यांना जिल्ह्यात थारा दिला जाणार नाही. त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे. जिल्ह्यात कोठेही अवैध धंदे सुरू असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी केले आहे. त्यावर तातडीने कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार! राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीचा प्लॅन ठरला; अमित शाहांनी रवींद्र चव्हाणांना काय सांगितलं?

Solapur Crime: छत्रपती शिवाजी महाराजांचा बेकायदा पुतळा बसवल्याप्रकरणी अंकोलीच्या अकरा जणांवर गुन्हा; शासकीय नियमांचे उल्लंघन!

SCROLL FOR NEXT