सातारा

महाविद्यालयीन तरुणाला लुटल्याप्रकरणी साताऱ्यात दोघांना अटक

प्रवीण जाधव

सातारा : वाढे फाटा परिसरात सेवा रस्त्यावर उभ्या असलेल्या महाविद्यालयीन तरुणाला लुटल्याप्रकरणी दोघांना तालुका पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत अटक केली आहे. करण अनिल लादे व अक्षय राजेंद्र चव्हाण (दोघे रा. कोयना सोसायटी, सातारा) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. 

याबाबत आकाश शंकर चौगुले (रा. मंगळवार पेठ) या युवकाने फिर्याद दिली होती. बुधवारी (ता. 9) तो वाढे फाटा परिसरात सेवा रस्त्यावर मित्रांची वाट पाहात उभा होता. त्या वेळी चार संशयितांनी त्याला मारहाण करून एक हजार तीनशे रुपये व मोबाइल जबरदस्तीने हिसकावून नेला होता. याबाबतची फिर्याद दाखल झाल्यानंतर निरीक्षक सजन हंकारे यांनी तालुका पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला संशयितांना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी यांनी एका संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली, तसेच अक्षयही या गुन्ह्यात सहभागी असल्याचे सांगितले. श्री. चौधरी, हवालदार दादा परिहार, सुजित भोसले, नीतिराज थोरात, सागर निकम, उदयसिंह पावरा हे या कारवाईत सहभागी होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought Criteria : दुष्काळ निकषांची पडताळणी सुरू बारा ऑक्टोबरपूर्वी घोषणा शक्य

Gokul Election 2026 : 'गोकुळ'चं राजकारण तापलं! मंत्री मुश्रीफ, विनय कोरेंनी नियोजित दौरे रद्द करून गाठली मुंबई; नेत्यांची जोरात फिल्डिंग, राजकीय चर्चांना उधाण

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, हवामान तज्ज्ञांच्या इशाऱ्यानंतर जोरदार पाऊस

Aaditya Thackeray Disha Salian case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ? दिशा सालियानचे वडील सतीश सालियान अब्रुनुकसानीची नोटीस घेऊन मातोश्रीवर जाणार

PM Kisan e-KYC : शेतकऱ्यांनो लक्ष द्या! 'पीएम किसान'साठी 31 ऑक्टोबरची मुदत; ई-केवायसी, भूमी अभिलेख नोंद पूर्ण करणे आवश्यक, ताबडतोब करा 'हे' काम

SCROLL FOR NEXT