Satara Latest Marathi News
Satara Latest Marathi News 
सातारा

बांधकाम विभागाचे पितळं पडलं उघडं; ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गावर चर बुजविण्याचा दिखावाच!

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : मोबाईल कंपनीची केबल पुरण्यासाठी ढेबेवाडी-कऱ्हाड रस्त्यावर साईकडे फाट्यानजीक खोदलेली आडवी चर वाहनचालकांच्या तक्रारीनंतर बुजविण्याचा संबंधितांनी केलेला दिखावा आता उघड झाला आहे. घाईघाईने भरून घेतलेली ही चर पुन्हा उघडी झाल्याने भरधाव वाहने त्यात आढळून लहान-मोठे अपघात घडत आहेत. बांधकाम विभागाच्या या अक्षम्य दुर्लक्षाबद्दल वाहनचालक व प्रवाशातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
 
ढेबेवाडी- कऱ्हाड मार्गाचे चौपदरीकरण झाल्याने वाहतुकीत सुसूत्रता आलेली असली, तरी वेगवेगळ्या कारणासाठी होणारी रस्त्याची खुदाई व वाहनचालकांची मनमानीमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेला रस्ता अलीकडे केबल पुरण्याच्या नावाखाली बाजूने कुरतडण्यात आला असून, त्यासाठी काही ठिकाणी ब्रेकरचाही वापर केल्याचे दिसते. बांधकाम विभागाचे अधिकारी संबंधितांनी रितसर परवानगी घेऊन आणि नुकसान भरपाई भरून कामे केल्याचे सांगत असले, तरी परवानगी व प्रत्यक्षातील खोदकामाची तपासणी होण्याची गरज आहे. 

साईकडे फाट्याजवळच्या रस्त्यावर खोदलेली आडवी चर वाहनचालक व प्रवाशांच्या जिवावर उठण्याची भीती निर्माण झाल्याने संबंधितांनी ती घाईघाईने भरून घेतली; परंतु त्यांचा हा दिखाऊपणा आता उघडा पडला. चर भरून घेतल्यानंतर त्यावर पाणी मारण्यासह मजबुतीसाठीच्या अन्य उपाययोजना न केल्याने ही चर पुन्हा उघडी झाल्याने भरधाव वाहने त्यात आढळून लहान- मोठे अपघात घडत आहेत. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT