Satara Latest Marathi News Satara News 
सातारा

काय सांगता! चक्क रस्त्यावरील दुभाजकांवरचं थापल्या गोवऱ्या; ढेबेवाडी-कऱ्हाड मार्गाचे विद्रुपीकरण

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : रस्त्यावरील दुभाजकाचा वापर नागरिकांकडून चक्क गोवऱ्या थापण्यासाठी केला जात असल्याने ढेबेवाडी-कऱ्हाड रस्त्याचे ठिकठिकाणी अक्षरशः विद्रुपीकरण सुरू असल्याचे चित्र दृष्टीला पडत आहे. गोवऱ्या थापण्यासाठी महिला वाहनांच्या वर्दळीतून डोक्‍यावरून शेणाच्या पाट्यांची ने-आण करत असल्याने अपघाताची भीतीही वाढली आहे. 

रात्रंदिवस वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या ढेबेवाडी-कऱ्हाड रस्त्याचे चार वर्षांपूर्वी चौपदरीकरण झाले असून, रस्त्यामध्ये ठिकठिकाणी दुभाजक बसविले आहेत. आतापर्यंत तेथील दुभाजकांचा वापर तेथे वाढलेल्या गवतात जनावरे चरायला सोडण्यासाठी, व्यवसायाच्या जाहिरातींचे विनापरवाना फलक लावण्यासाठी आणि त्यात लावलेली फुलझाडे व अँटी ग्लेअरची विनाकारण तोडफाड करण्यासाठी होताना दिसत होता. मात्र, अलीकडे त्यावर चक्क गोवऱ्या थापण्यास सुरुवात झाल्यामुळे कोट्यवधींचा खर्च करून तयार केलेल्या या रस्त्याचे विद्रुपीकरण कुणी रोखणार आहे, की नाही असा सवाल उपस्थित होत आहे. 

या मार्गलगत अनेक गावे वसलेली असून, गावच्या प्रवेशद्वाराजवळचे चौक विकसित झाल्याने लोकांची सतत तेथे गर्दी असते. महिलांकडून सकाळी व सायंकाळी शेणाच्या पाट्या भरून आणून दुभाजकावर गोवऱ्या थापायचे काम सुरू असल्याचे दिसते. सध्याही ते सुरूच असून, उन्हात वाळवत टाकलेल्या व वाळलेल्या गोवऱ्यांचे दुभाजकात लावलेले ढीग अनेक गावांजवळ दिसून येत आहेत. रस्त्यात जागा गेल्याने गोवऱ्या थापायला नियमितची जागा नसल्याचे काहींचे म्हणणे असले, तरी त्यांनी स्वतःसह कुटुंबातील व्यक्तींच्या सुरक्षेची काळजी घेणेही गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. 

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs MI Live : १४ चेंडूंत ४ विकेट्स! शार्दूल ठाकूरचा भन्नाट मारा... श्रेयस अय्यर आला तसा गेला, जसप्रीतचा डाव यशस्वी; Video

Pune News : नदी काठ सुधारसाठी मिळाली ५२ हजार चौरस मिटर जागा; राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय

Pune News : व्हीआयपी दौऱ्यातील ताफा आता निम्म्यावर; पुणे पोलिसांचा निर्णय

Pune Garbage Management : बालेवाडीत कचरा संकलनासाठी पीएमपी बस डेपोची ३ हजार चौ.फु. जागा; स्थायी समितीची मंजुरी

Vaibhav Sooryavanshi ला टीम इंडियात संधी मिळाली, LSG च्या संजीव गोएंका यांची पोस्ट व्हायरल! म्हणतात, देश आश्चर्याने पाहत आहे...

SCROLL FOR NEXT