सातारा

राजकीय संघर्ष उफाळणार; विविध गटातटांसह अपक्षही मैदानात

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : कुळकजाई (ता. माण) ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत इच्छुकांनी बाह्या सरसावल्या आहेत. गटातटांसह अपक्ष मैदानात उतरल्यामुळे राजकीय संघर्ष उफाळणार आहे. 

कुळकजाई ही पश्‍चिम माणमधील समूह ग्रामपंचायत आहे. त्यात कुळकजाई, कळसकरवाडी, गाडेवाडी व खोकडे यांचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या नऊ आहे. कुळकजाईतून पाच, कळसकरवाडीतून 2, तर गाडेवाडी व खोकडेतून प्रत्येकी एक सदस्य निवडला जातो. 2010 साली ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. तर 2015 साली राष्ट्रवादी विरुध्द कॉंग्रेस अशी चुरशीची निवडणूक झाली होती. शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीचे, तर आमदार जयकुमार गोरे यांनी कॉंग्रेसचे नेतृत्व केले होते. स्थानिक पातळीवर रमेश शिंदे, कुमार पोतेकर, किसनराव शेडगे, आप्पासाहेब बुधावले, अमर कुलकर्णी, बशीर मुलाणी आदी नेतेमंडळींनी आपल्या गटातटांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. त्यावेळी विजयी व पराभूत उमेदवारांतील फरक फक्त एक आकडी मतांचा होता. अगदी निसटता विजय राष्ट्रवादीच्या पारड्यात पडला होता. 

पाच विरुद्ध चारने ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता आली होती. यावेळी सर्व ज्येष्ठ मंडळींनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायत निवडणुकीतून माघार घेतली आहे. तर तरुणांना संधी देऊन यंदाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पावले उचलली होती. पण, बिनविरोध संधी मिळतेय तर मला का नको? असा पवित्रा बहुतेक तरुणांनी घेतला. त्यामुळे बिनविरोधच्या प्रयत्नांवर पाणी पडले. नऊ जागांसाठी 47 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे दोन पॅनेल तसेच अपक्ष अशी निवडणूक रंगण्याची चिन्हे आहेत.

ज्येष्ठांकडून प्रयत्न सुरूच 
निवडणूक लढविण्यासाठी तरुण सरसावले असले तरी ज्येष्ठ मंडळींनी अजून प्रयत्न सोडले नाहीत. अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीत तरुणांना समजावून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मनधरणी सुरू ठेवली आहे. ज्येष्ठांच्या प्रयत्नांना यश येणार की तरुण आपला हेका कायम ठेवणार, हे चार जानेवारीला समजेल. तोपर्यंत पडद्याआडून बऱ्याच हालचाली घडणार आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'नितीश कुमारजी तुमचं धोतर खेचलं तर...' बुरखा खेचण्यावरुन राखी सावंत भडकली, जाहीर माफाची केली मागणी

BMC मुख्यालयात रात्रीस खेळ चाले! निवडणूक जाहीर होताच प्रशासनाचा रात्रभर 'कारभार', आचारसंहिता भंग?

Latest Marathi News Live Update : पुणे काँग्रेसभवन मध्ये इच्छुकांची मोठी गर्दी

Ashes Test: पुन्हा राडा! ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी अम्पायरला घेरले; मिचेल स्टार्कचे वादग्रस्त विधान स्टम्प माईकने टिपले, Viral Clip

Bank Holiday : आजपासून 5 दिवस देशभरातील बँका बंद! राज्यातील बँकाही 4 दिवस बंद; कधी ते जाणून घ्या?

SCROLL FOR NEXT