सातारा

'रयत-अथनी'ने फोडली ऊसदराची कोंडी; जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा

अनिल घाडगे

शिरवडे (जि. सातारा) : रयत- अथनी साखर कारखान्याने एक रकमी एफआरपी अधिक 33 रुपये असा 2900 रुपये दर जाहीर करून सातारा जिल्ह्यातील ऊस दराची कोंडी फोडली. 

रयत- अथनी साखर कारखाना हा अतिशय दुर्गम भागातील साखर कारखाना असून, कोणताही प्रोग्रॅम राबवलेला नाही. मिळेल तो ऊस गाळप करून एकरक्कमी उच्चांकी दर दिला. त्याबद्दल सातारा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्याचे कार्यकारी संचालक शैलेश देशमुख यांचा संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

याच पद्धतीने जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी लवकरात लवकर एकरकमी एफआरपी दर जाहीर करावा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले. या वेळी स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, संघटनेचे कऱ्हाड दक्षिणचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब साळुंके, कऱ्हाड उत्तरचे तालुकाध्यक्ष प्रमोदसिंह जगदाळे, कऱ्हाड दक्षिण तालुकाध्यक्ष रामचंद्र साळुंखे, विकास पाटील, रवी शेवाळे, शेवाळे मामा उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : आंदेकर टोळीवर आणखी एक गुन्हा; सदनिकांची विक्री करून फसवणूक

Thane Crime: दिवाळीआधीच भाजप नेत्यावर कारवाईचा फटाका फुटला! बेकायदेशीर फटाके ठेवले अन्...; गुन्हा दाखल

Pune News : नदीकाठ सुशोभीकरणासाठी पुणे महापालिकेला शासकीय जमीन हस्तांतरित

कांतारा पार्ट 1 च्या यशानंतर रिषभ शेट्टीने मानले प्रेक्षकांचे आभार ! गंगा आरतीत सहभागी झाल्याचा व्हिडीओ चर्चेत

Latest Marathi News Live Update: सर्व आरोपांची पडताळणी झाली पाहिजे - सुळे

SCROLL FOR NEXT