Satara Latest Marathi News 
सातारा

वीजबिलासाठी 'महावितरण'ची धडक कारवाई; कऱ्हाडात तोडली दोन हजार शेतीपंपांची कनेक्शन

हेमंत पवार

कऱ्हाड (जि. सातारा) : शेतपंपाच्या थकीत विजबील वसुलीसाठी महावितरणने धडक कारवाई करत वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत कऱ्हाड व पाटण तालुक्यातील दोन हजारांवर शेती पंपाची कनेक्शन तोडण्यात आली. शेतकऱ्यांनी एकत्र येवून सुरु केलेल्या पाणी योजनांचे बिल भरायचे कोणी यावरुन पाणी योजनांची काही दिवस कनेक्शन बंद राहिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकवलेली पिके ऐन उन्हाळ्यात वाया जाण्याच्या मार्गावर आहेत.

शेती पाण्याचा प्रश्न सुटावा यासाठी काही शेतकऱ्यांनी एकत्रीत येवून पाणी सिंचन योजना सुरु केली. काही ठिकाणी साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या माध्यमातून सहकारी उपसा सिंचन योजना सुरु केल्या आहेत, तर काही शेतकऱ्यांनी स्वतः धाडस करुन पाणी योजना सुरु केल्या आहेत. कऱ्हाड-पाटण तालुक्यातील काही भाग वगळता सर्व क्षेत्र बागायती आहे. शेतकरी ऊसाबरोबरच कमी कालावधी पैसे मिळत असल्याने भाजीपाला, पालेभाज्या आणि फळपिके घेतात. त्यामुळे या भागातील अनेक शेतकरी आर्थिकदृष्टा बरी परिस्थिती असलेले आहेत. मागील वर्षी कोरोनाचे मोठे संकट आहे. त्यामुळे सर्वच अर्थचक्र बंद राहिले. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल शेतामध्येच वाया जावून त्यांचे मोठे नुकसान झाले. परिणामी शेतकऱ्यांची घरगुती आणि शेती पंपाची वीज बिलेही प्रलंबित राहिली. त्यातून कऱ्हाड व पाटण तालक्यातील २३ हजार शेती पंपाची तब्बल १३२ कोटी रुपये थकीत राहिली होती. त्यामुळे महावितरणपुढेही बिल वसुलीचे मोठे आव्हान होते. 

त्यासाठी महावितरणने शेतकऱ्यांना बीलात ५० टक्के सवलत दिली, तरीही शेतकरी वीजबील माफी होईल म्हणून थांबले होते. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यात काहीच तोडगा निघाला नाही. परिणामी, शेतकऱ्यांना वीजबिल भरण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही. त्यातच महावितरणने वीजबिल वसुलीसाठी थेट कनेक्शन कट करण्याची धाडसी मोहीम हाती घेतली आहे. त्यातुन आत्तापर्यंत कऱ्हाड-पाटण तालुक्यातील दोन हजारवर वीज कनेक्शन कट करण्यात आली आहेत. त्यातील सामूहिक शेतीपंपाची बिले भरण्यात न आल्याने शेतकऱ्यांची पिके ऐन उन्हाळ्यात वाळू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे.

शेती पंपाच्या थकीत वीजबिल वसुलीसाठी कऱ्हाड-पाटण तालुक्यातील दोन हजारांवर वीज कनेक्शन कट करण्यात आली, ही वस्तुस्थिती आहे. त्यामागे शेतकऱ्यांचे नुकसान करणे हा हेतू नाही. मात्र, महावितरण चालण्यासाठी वसुली होणेही महत्वाचे असल्याने शेतकऱ्यांनी वीजबिल भरुन सहकार्य करावे.

-अभिमन्यू राख, कार्यकारी अभियंता, महावितरण

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC: PAK vs SL सामन्यात थरार! ४,६, ६, ६... श्रीलंकेच्या कर्णधारानं दिलेलं पाकिस्तानला टेन्शन, पण शेवटच्या चेंडूवर यजमान पराभूत

PAK vs SL: श्रीलंकेने १४८ धावा करताच पाकिस्तानचा 'गेम ओव्हर'! T20 WC सेमीफायनल भारतातच होणार...

छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले शिल्प महाराष्ट्रात नाही, तर तमिळनाडूच्या 'या' किल्ल्यावर; मराठ्यांचा ज्वलंत इतिहास, एकदा नक्की बघा

T20 WC, PAK vs SL: साहिबजादा फरहानचे शतकासह विश्वविक्रम, पाकिस्तान २०० पार; पण श्रीलंकेत फिक्सिंगची चर्चा; जाणून घ्या कारण

Ganja Seized : बारामतीत अडीच कोटींचा 470 किलो गांजा हस्तगत...

SCROLL FOR NEXT