Satara Latest Marathi News, Satara News
Satara Latest Marathi News, Satara News 
सातारा

भाजपकडून शेतकरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न; मोदी सरकारविरोधात रिपाइं आक्रमक

गिरीश चव्हाण

सातारा : दिल्ली येथे सुरू असणारे शेतकरी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तसेच गॅस, डिझेल, पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ आज येथे रिपब्लिकन पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहे. 

निवेदनात कृषी कायदे मागे घेण्यासाठीच्या मागणीसाठी राजस्थान, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेशमधील शेतकरी दिल्ली येथे आंदोलन करत आहेत. हे आंदोलन केंद्र सरकार बळाचा वापर करून दडपण्याचा प्रयत्न करत आहे. केंद्र सरकार लोकशाहीची पायमल्ली करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याचबराबेर केंद्र शासन गॅस, डिझेल, पेट्रोलचे भाव दररोज वाढवत आहे. या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. ही भाववाढ मागे घेण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या आंदोलनात दादासाहेब ओव्हाळ, मदन खंकाळ, किरण ओव्हाळ, किरण बगाडे, विक्रम वाघमारे, अशोक जाधव, सुनील गाडे, किरण गाडे, सोमनाथ धोत्रे आदी सहभागी झाले होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT