Satara Latest Marathi News 
सातारा

गुड न्यूज! कोरोना चाचणीनंतर मिळणार मोबाईलवर तपासणी अहवाल; आरटीपीसीआरनंतर लागणारा वेळ होणार कमी

उमेश बांबरे

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. वाढत्या कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी व्यापारी, किराणा दुकानदार, भाजी विक्रेत्यांनी चाचणी करून घेऊनच दुकानात बसावे. अशा कोरोना चाचण्या करण्यासाठी प्रशासनाकडून मिशन मोडवर काम केले जावे, तसेच लसीकरणाचा वेग वाढवा, अशा सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
 
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज कोरोना संसर्ग आढावा बैठक पालकमंत्री पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या वेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये उपस्थित होते. 

यापुढे कोरोनाची चाचणी केल्यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालयाकडून या तपासणीचा अहवाल मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून लिंक मिळेल. त्या लिंकवर क्‍लिक केल्यानंतर संबंधिताला अहवाल प्राप्त होणार आहे. अशी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. त्यामुळे आरटीपीसीआर केल्यानंतर लागणारा विलंब आता संपणार आहे. घरबसल्या सुविधा प्राप्त होणार आहे. त्यामुळे फार काळ ताटकळत बसण्याची गरज लागणार नाही. त्यामुळे जवळचे कोणी कोरोना पॉझिटिव्ह आले, तर उशीर न करता तुमचीही चाचणी करून घ्या, असे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केले. 

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचा दर 16.21 असून, बरे होण्याचा दर 93.96 इतका आहे. मृत्यूचा दर 3.67 इतका आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी आता लोक पुढे येत आहेत. वाढता प्रतिसाद पाहून जिल्ह्याने लशीची मोठ्या प्रमाणात मागणी राज्य शासनाकडे नोंदविली आहे. कोरोना संसर्ग रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कमीतकमी 20 जणांची कोरोना चाचणी करून घ्यावी. ग्रामीण भागात या कामासाठी ग्राम दक्षता समितीने आणि शहरातील स्थानिक समित्यांनी प्रशासनाला मदत करावी, असेही पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काव्या मारनच्या संघाने पाकिस्तानी अबरार अहमदला करारबद्ध केले... BCCI ने दिली प्रतिक्रिया; म्हणतात, आमचा काही संबंध नाही

स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात कलाकारांच्या गुरुजनांना मानाचा मुजरा, गुरु-शिष्याची अनोखी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस

Mumbai News: ताडदेवस्थित वेलिंग्डन हाइट्सचे प्रकरण; तातडीच्या सुनावणीस न्यायालयाचा नकार, कोर्टात काय घडलं?

LPG Booking: गॅस सिलेंडर बुकिंग नियमात आठवड्यात 3 वेळा बदल! गावाकडे आता किती दिवसांनी करता येणार बुकिंग?

Clerk Bribery Viral Video : निवृत्त महिलेकडून 45 हजारांची लाच घेताना बडा लिपिक कॅमेऱ्यात कैद; नोटा मोजतानाचा तोरा तर पाहा, आरोग्य विभागात खळबळ

SCROLL FOR NEXT