Satara Latest Marathi News 
सातारा

लॉकडाउनच्या निर्बंधामुळे रिक्षा व्यावसायिक संतप्त; साताऱ्यात सरकारविरोधात तीव्र आंदोलन

गिरीश चव्हाण

सातारा : कोरोना व लॉकडाउनमुळे रिक्षा व्यावसायिक अडचणीत असून केंद्र व राज्य सरकारने या अडचणीत भर घालणारे धोरण अवलंबले आहे. या धोरणाचा पुनर्विचार करण्याच्या मागणीसाठी आज अखिल महाराष्ट्र कामगार, कर्मचारी संघाच्या वतीने रिक्षाचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.
 
याबाबतच्या निवेदनाच्या प्रती आंदोलक रिक्षाचालकांनी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयास दिल्या आहेत. या निवेदनात रिक्षाच्या नोंदणी शुल्कात वाढ न करण्याची, नोंदणी तसेच फिटनेस शुल्काची आकारणी पूर्वीच्या पध्दतीने करण्याची, नोंदणीस विलंब झाल्यास प्रतिदिन आकारण्यात येणारा 50 रुपयांचा दंड मागे घेण्याची, रिक्षांसाठी स्वतंत्र विमा गट करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

लॉकडाउन व त्यानंतरच्या काळातील निर्बंधामुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत आला असून हा व्यवसाय करणारे सर्वच सर्वसामान्य घरातील आहेत. मध्यंतरीच्या काळातील निर्बंधामुळे अनेकांचे बॅंक हप्ते थकले असून त्याचा विचार करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, शशिकांत खरात, गणेश भिसे, संदीप कांबळे तसेच इतर रिक्षाचालक सहभागी झाले होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Buying Tips: जमीन खरेदी करताना फसू नका! व्यवहाराआधी 7/12 उताऱ्यापासून खरेदीखतापर्यंत 'या' गोष्टी नक्की तपासा!

Explained: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकांमध्ये 'इतक्या' मुस्लिम उमेदवारांनी मारली बाजी; एकाने तर इतिहासच रचला, काय असेल पुढील आव्हान?

IND vs NZ, 1st ODI: आधी अर्शदीपचा तिखट मारा अन् मग विराट कोहलीची वादळी फिफ्टी! भारताची विजयासह वनडे मालिकेची दणक्यात सुरुवात

ना वडिलांचं नाव, ना आडनाव! तब्बू फक्त 'तब्बू' नाव का लावते? हे आहे कारण

अतुल परचुरे यांचा शेवटचा चित्रपट पाहिलात का? 'अंत एक प्रारंभ'चा ट्रेलर प्रदर्शित; प्रीमियरची तारीखही ठरली

SCROLL FOR NEXT