Satara Latest Marathi News 
सातारा

Good News! आता कोरोना रुग्णांची सेवा करणार 'रोबोट'; औषध, गोळ्यांचीही काळजी घेणार

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : रुग्णालयात दाखल, तसेच होम क्वारंटाइन केलेल्या कोरोना रुग्णांपर्यंत गोळ्या- औषधे, तसेच साहित्य पुरविण्याबरोबरच तेथील फरशीची साफसफाई करणारा अनोखा रोबोट येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या अथर्व चंद्रकांत पाटील या विद्यार्थ्याने बनविला आहे. 

ढेबेवाडी विभागातील मंद्रुळकोळे हे अथर्वचे मूळगाव असून, त्याने बनविलेल्या उपकरणांना विविध विज्ञान प्रदर्शनातून पारितोषिके मिळाली आहेत. विज्ञान शिक्षक व रयत शिक्षण संस्थेचे आजीव सेवक डॉ. सुधीर कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी इन्स्पेक्‍टर मोहनराव कदम यांच्या प्रोत्साहनाने दोन आठवडे मेहनत घेऊन त्याने हा रोबोट प्रत्यक्षात साकारला. त्यासाठी घरात पडून असलेल्या काही वस्तूंसह बाजारातील इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंचाही त्याने वापर केला आहे. हा रोबोट बेसला बसविलेल्या चाकांवरून इकडून तिकडे फिरतो. त्याच्या हातावर बसावलेल्या ट्रे मधून औषधे, गोळ्या, तसेच अन्य वस्तू रुग्णांपर्यंत पोचवता येतात. शिवाय त्याला बसविलेल्या स्क्रबलने फरशीची साफसफाईही करता येते. त्यासाठी जंतुनाशक किंवा फिनेलचा कॅन बसविण्याची व्यवस्थाही त्यात केलेली आहे. 

रोबोटला बसविलेली बॅटरी चार तास चार्ज केल्यावर तो आठ तास कार्यरत राहतो. त्यावर बसविलेल्या वायफाय कनेक्‍ट कॅमेऱ्याद्वारे रुग्णांशी संवाद साधता येतो. 20 फुटांच्या अंतरात रिमोटच्या साह्याने रोबोट नियंत्रितही करता येतो. रोबोट बनविण्यासाठी एक हजार रुपये खर्च आल्याचे अथर्व सांगतो. भविष्यात खूप अभ्यास करून वेगवेगळे संशोधन करायचे आणि शास्त्रज्ञ बनून देशसेवा करायचे अथर्वचे स्वप्न आहे. त्याच्या यशाबद्दल प्राचार्य जी. जी. साठे यांनी अथर्व व मार्गदर्शक शिक्षक डॉ. सुधीर कुंभार, तत्कालीन प्रभारी प्राचार्य एस. एस. कदम आदींचे कौतुक केले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Election Date : ‘गोकुळ’च्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला? ऑक्टोबर महिन्यात मतदान, मतमोजणी होणार

पंजाब नॅशनल बँकेच्या तिजोरीत तब्बल १७ कोटी २९ लाख रुपयांच्या बनावट नोटा; मॅनेजरला अटक, तीन कर्मचारीही निलंबित

स्टार प्रवाहच्या 'मी कात टाकली'मध्ये दिसणार नवा चेहरा; कोण आहे हा अभिनेता? नवा प्रोमो चर्चेत; 'ही' मालिका घेणार निरोप

'दातापासून ते चेहऱ्याच्या हावभावापर्यंत; ‘दुआ तर अगदी रणवीरची कॉपीच’ नेटकऱ्यांनी रणवीरचे लहाणपणीचे फोटो काढले शोधून, Photo Viral

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

SCROLL FOR NEXT